दैनिक चालु वार्ता ठाणे ग्रामीण प्रतिनिधी -विकी जाधव
ठाणे,दि.06(जिमाका) : बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखीत “आनंदमठ” या कादंबरीतील असंख्य क्रांतीकारकांना प्रेरणादायी असे “वंदे मातरम्” या ऐतिहासीक गीतास 150 वर्ष पूर्ण होत आहेत. या गीतास स्वातंत्र्यलढ्यात व स्वातंतत्र्योत्तर कालखंडात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
या गीतास दि.07 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्ष पूर्ण होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार व सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड.आशिष शेलार व कौशल्य विकास अॅड.मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून “वंदे मातरम्” गीताचे सामुहीक गायनाचा, तालुकास्तरीय कार्यक्रम कल्याण येथील कै.वासुदेव बळवंत फडके मैदानावर दि.7 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9.30 ते 10.30 या दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे.
हा कार्यक्रम भव्य व दिमाखदार पध्दतीने सपंन्न करावयाचा असल्याने कल्याण व डोंबिवली शहरातील लोकप्रतिनिधी खासदार, आमदार तसेच माजी नगरसेवक या सर्व मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमास तालुक्यातील सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माधवराव काणे शासकीय आद्योगिक प्रशिक्षण संस्था, कल्याणचे प्राचार्य रा.अ. हिरे यांनी केले आहे.



