थेट म्हणाले; फेटा खाली…
इंदुरीकर महाराज सध्या त्यांच्या किर्तनामुळे नाही तर त्यांच्या लेकीच्या साखरपुड्यामुळे तूफान चर्चेत आहेत. इंदुरीकर महाराजांची लेक ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा संगमनेरच्या वसंत लॉन्समध्ये अत्यंत शाही पद्धतीने झाला.
जवळपास 2000 लोकांची उपस्थिती आणि शाहीथाट बघायला मिळाला. महाराजांची लेक ज्ञानेश्वरी भला मोठा गाड्यांचा ताफा घेऊन मंगल कार्यालयात डोळ्यावर गॉगल लावून पोहोचली. एक न्यारा थाट महाराजांच्या लेकीचा दिसला. मात्र, या साखरपुड्यातील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्ध किर्तनकार आणि समाजप्रभोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज टिकेचे धनी ठरले. वारकरी संप्रदायाकडून त्यांच्यावर टीका झाली. किर्तनात साधी लग्न करण्याचा उपदेश देणारे महाराज लेकीच्या साखरपुड्यात पैशांची उधळण करताना दिसले.
लेकीच्या साखरपुड्यानंतर महाराजांवर सतत टीका होत असतानाच आता महाराजांनी यावर थेट भाष्य केले. फक्त भाष्यच नाही तर महाराजांनी अत्यंत मोठे विधान करत लवकरच निर्णय घेणार असल्याचे म्हटले. सततच्या टीकेमुळे इंदुरीकर महाराज नाराज झाले आहेत. इंदुरीकर महाराजांनी म्हटले की, आम्ही संसार कसा केला हे या लोकांना माहिती नाही. किती कष्ट करत इथंपर्यंत पोहोचलो, याचा लोक अजिबातच विचार करत नाहीत.
माझ्यापर्यंत ठीक होते… पण आता माझ्या मुलीला पण बोलले जात आहे. तिच्या कपड्यांबद्दल बोलले जात आहे. लोक किती खालच्या पातळीवर गेले हे कळते. अहो… मला लावा ओ घोडे माझा पिंड गेला पण माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे. मी आठ आठ दिवस लेकरांना कधी भेटत नव्हतो. या लोकांनी माझे जगणे कठीण केलंय. मी पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये एक क्लिप टाकणार आहे. कंटाळाला आला मला.
मी गेल्या तीस वर्षांपासून फक्त टीकाच सहन करत आलोय. मात्र, विषय आता माझ्या घरापर्यंत आला.माझ्यापर्यंत सर्व टीका ठीक पण कुटुंबापर्यंत गेले आहे आणि हे अजिबात ठीक नाहीये. त्यामुळे मला अक्कल आली पाहिजे. मी आता फेटा खाली ठेवण्याच्या विचारात आहे. थोडक्यात काय तर इंदुरीकर महाराज यांनी थेट किर्तन सेवा थांबवण्याचे मोठे संकेत दिले आहेत. सर्व सहन करण्यापलीकडे गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. इंदुरीकर महाराजांनी पुढील काही दिवसांमध्ये व्हिडीओ तयार करणार असल्याचेही म्हटले आहे.


