■ समिर शिरवडकर-रत्नागिरी
राजापूर :- ( नाटे) :- तालुक्यातील नाटे मधिल अनधिकृत गोवा बनावटीची दारू दि.०५ डिसेंबर २५ रोजी सायंकाळी ७.०० च्या सुमारास स्थानिक पोलीस ठाणे प्रमुख वाघ यांनी पकडुन पंचनामा करुन गुन्हा नोंद केल्याचे समजते.
तालुक्यातील नाटे मध्ये कित्येक वर्ष गोवा बनावटीच्या दारू ची विक्री खुलेआम केली जाते,याबाबत काही वृत्तपत्र मध्ये बातमी प्रसिद्ध सुद्धा झाली होती.परंतु, याबाबत उत्पादन शुल्क विभाग मात्र विक्री होत नसल्याचे सांगता होते.नाटेतील गोवा बनावटीची दारू तालुक्यातील कुंभवडे मधुन पुरवठा केल्याचे समजते.पकडलेल्या गोवा बनावटीचा एक बॉक्स जप्त करून पुढील तपास नाटे पोलीस ठाणे प्रमुख वाघ करीत आहेत.
