कात्रज, पुणे (जयदिप निंबाळकर)
माय माऊली केअर सेंटर, कात्रज येथे ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी स्नेहमेळावा तसेच विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आज उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व विशेष उपस्थितांमध्ये दानशूर, समाजरत्न व समाजभूषण तसेच ठाण्याच्या एन.के.टी. कॉलेजचे प्रेसिडेंट मा. श्री. नानजीभाई ठक्कर ठाणेवाले तसेच मा.श्री. सुनील भाऊ रासने (अध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे), एम.जे. एफ. लायन. राजेशजी अगरवाल (डिस्ट्रिक्ट गव्हर्नर),मा. श्री. राहुल कुमार खिलारे (वरिष्ठ पीआय, भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे), मा. श्री. कृष्णाजी शेलार (अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ, कात्रज परिसर), मा. श्री. गिरीशभाई शहा (विश्वस्त, श्री संतोषीमाता मंदिर, संतोषनगर, कात्रज), मा. श्री. बाळासाहेब धोका (संस्थापक अध्यक्ष, आनंद दरबार, कात्रज), मा. श्री. कांतीरामजी बोऱ्हाडे पाटील (सामाजिक कार्यकर्ते व आदिवासी सुधारक) यांची उपस्थिती लाभली.
प्रारंभी विठ्ठलराव वरुडे-पाटील व परिवाराच्या वतीने विधिवत पद्धतीने नानजीभाई ठक्कर यांची पाद्य पूजन केले. तसेच माय माउली केअर सेंटरची पाहणी केली. यावेळी ठक्कर यांनी संस्थेतील रुग्ण आजी-आजोबांशी मोकळेपणाने संवाद साधत त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.समाजसेवेचा प्रदीर्घ अनुभव सांगताना त्यांनी आता पर्यंत उभारलेल्या हजारो मंदिरांबरोबरच लाखो विद्यार्थ्यांना दिलेल्या मोफत शिक्षणाची व अनेक गरजू नागरिकांना दिलेल्या मोफत आरोग्यसेवेची माहिती दिली.
व्याख्याते प्रा. बाळकृष्ण पांडुरंग डहाळे यांनी “तणावमुक्त जीवन” या विषयावर मार्गदर्शन करत सकारात्मक विचार, नियमित दिनचर्या आणि सामाजिक कार्यात सहभागाबद्दलचे महत्त्व सांगितले. यावेळी विठ्ठलराव वरुडे पाटील यांनी सांगितले की हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांच्या मनाला आनंद व समाधान देणारा ठरला असून उपस्थितांनी या कार्यक्रमाच्या उत्तम आयोजनाबद्दल धन्यवाद देत आशिर्वाद दिले याचा मनस्वी आनंद झाला. जेष्ठ नागरिक व रुग्णासाठी हा चंदनाप्रमाणे झिजवला जाईल अशी भावना व्यक्त केली.
या आनंदमेळावा कार्यक्रमाची सांगता पसायदानाने तसेच उपस्थित ज्येष्ठ नागरिकांसोबत मनमोकळेपणाने चर्चा अल्पोपहाराने झाली.
