दैनिक चालू वार्ता मोहोळ प्रतिनिधी -बापू घळके
देशातील आयआयटी व एनआयटीसारख्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी महत्त्वाची असलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) मेन्स परीक्षा २०२६ निकाल राष्ट्रीय चाचणी संस्थेने १६ फेब्रुवारी २०२६ जाहीर केला त्या परीक्षेमध्ये कै. शंकराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अनगर प्रशालेतील तसेच बिटले गावचे गणित शिक्षक आनंद आदलिंगे सरांचा विद्यार्थी मंगेश रामचंद्र जाधव याने जेईई मेन्समध्ये मध्ये ८५.२७ पर्सेंटाइल स्कोअर घेऊन उत्तुंग यश मिळवले आहे.विशेष म्हणजे गणित विषयांमध्ये ९७. ९३ पर्सेंटाइल स्कोर घेतला.यंदा १३ लाखाहून अधिक विद्यार्थि या परीक्षेत सहभागी झाले होते, जेईई मेन्समध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची कामगिरी उल्लेखनीय राहीली आहे, अनेक विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवून टॉपर्स मध्ये स्थान मिळवले आहे यामध्ये मंगेश जाधव हा असल्याने बिटले ग्रामस्थांसाठी कौतुकास्पद आहे मंगेश च्या या यशाबद्दल माजी आमदार राजन पाटील, लोकनेते कारखान्याचे चेअरमन विक्रांत पाटील,सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील व बिटले ग्रामस्थ, मुख्य प्रशासकीय अधिकारी ढोले , प्राचार्य चोपडे , उपप्राचार्य खरात , पर्यवेक्षक डोके यांनी अभिनंदन केले
