दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा मोहोळ प्रतिनिधी -बापू घळके
( वडील सुनिल घाटुळे यांनी सुरू केलेल्या नर्सरी उद्योगाच्या पपई व भाजीपाला रोपांची राज्याबाहेर वाढवलेल्या लौकीकाची दैनिक चालू वार्ता ने घेतली दखल)
शहरात इंजिनिअरिंग चे शिक्षण घेतलेली मुले सहसा ग्रामीण भागात रमत नाहीत परंतु अनगर येथील प्रगतशील शेतकरी सुनील घाटुळे यांचे सुपुत्र स्वानंद घाटुळे यांनी आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या नर्सरी उद्योगामध्ये आपले कॅरियर करायचे ठरविले, नर्सरी उद्योग सांभाळताना अल्पावधीतच त्यांनी आधुनिक पद्धतीने सुसज्ज अशा हायटेक नर्सरीचा विस्तार केला पपई रोपांमध्ये जिपी चा वापर पहिल्यांदा करून वाहतूक खर्च कमी केला.मॅटपॉट पद्धत पपई रोपांसाठी निर्माण केली, शेती पिकांना ॲटोमेशन पाणी पद्धतीसह रोपांना सूद्धा पाणी मारण्यासाठी मशीन चा वापर सुरू केला,उत्कृष्ट व खात्रीशीर, दर्जेदार रोपांची शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाच राज्यात बांधावर पुरवठा साखळी निर्माण केली, आपल्या बरोबर महाराष्ट्रातील इतरही बेरोजगार तरुणांना नर्सरी उद्योगामध्ये उतरवून त्यांना नर्सरी उभा करून नर्सरी साठी लागणारे बि-बियाणे, कोकोपिठ, ट्रे, मल्चिंग पेपर, तयार मध्ये होलसेल रोपांची मदत करुन नर्सरी उद्योजकांची व्यावसायिक साखळी निर्माण केली.
स्वानंद सुनील घाटुळे यांच्या या व्यावसायिक व उद्योजकीय कार्याची पुणे येथील दैनिक चालू वार्ता आणि स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघाने दखल घेऊन या वर्षी चा दैनिक चालू वार्ता समाज रत्न पुरस्कार जाहीर केला आहे.
दैनिक चालू वार्ता व स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघाच्या माध्यमातून दर वर्षी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाज रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी १९ फेब्रुवारी रोजी हडपसर,पुणे येथील दैनिक चालू वार्ता वृत्तसेवेचे मुख्य कार्यालय या ठिकाणी सायंकाळी ४ वाजता विशेष अतिथी व संपादक मान्यवरांच्या हस्ते कृषी,सामाजिक, आध्यात्मिक, धार्मिक,राजकीय, शैक्षणिक,उद्योजक, व्यापारी,आरोग्य, साहित्य,कायदातज्ञ, पत्रकारिता, अभिनय, कला,क्रीडा, मनोरंजन,प्रगतशील शेतकरी,आदी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे,चालू वर्षातील अनगर येथील स्वानंद सुनील घाटुळे यांनी घाटुळे नर्सरी ऍन्ड ऍग्रो सर्व्हिसेस च्या माध्यमातून विविध भागातील शेतकरी बांधवांसाठी उभा केलेल्या प्रेरणादायी शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दैनिक चालू वार्ता वृत्तसेवेने दखल घेऊन त्यांना दैनिक चालू वार्ता समाज रत्न पुरस्कार २०२५ जाहीर केला आहे. त्यांच्या या पुरस्कार निवडी बद्दल अनगरसह महाराष्ट्र बाहेरच्या राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मित्र परिवार, आप्तेष्ट, स्वानंद घाटुळे यांच्या या यशाबद्दल सोशल मीडियावर तसेच प्रत्यक्ष भेटून व फोन कॉल वर अभिनंदन पर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.
वडीलांनी सुरू केलेला व्यावसाय मुलगा म्हणून चांगल्याप्रकारे चालवून त्यांची स्वप्नपुर्ती करताना पाच राज्यातील जोडले गेलेल्या शेतकरी बांधवांना आपल्या कडे जे आहे ते दर्जेदार व खात्रीशीर देण्याच्या शेतीपुरक नर्सरी क्षेत्रातील कार्याची घेतलेली दखल माझ्या साठी प्रेरणादायी आहे सदर पुरस्कार हा वडीलांनी रोवलेल्या मुहूर्तमेढीमुळे माझ्या सोबत जोडले गेलेल्या शेतकरी बांधवांचा आहे असे समजतो व दैनिक चालू वार्ता चे मनापासून आभार मानतो
स्वानंद सुनील घाटुळे – दैनिक चालू वार्ता समाज रत्न पुरस्काराचे मानकरी
