दैनिक चालू वार्ता -शिरूर प्रतिनिधी-इंद्रभान ओव्हाळ
(शिरूर ) शासनाचे स्पष्ट निर्देश, नागरी सेवा नियम व कार्यालयीन शिस्त यांची उघड पायमल्ली शिरूर तहसील व तलाठी कार्यालयात सुरू असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे.
सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी यापूर्वी दिलेल्या सामाजिक निवेदनाची पाठपुराव्यानंतर शिरूर(घोडनदी) चे “तहसीलदार बाळासाहेब म्हस्के” यांनी दखल घेत शासन परिपत्रकानुषंगाने व दि.०७/१०/२०२५. रोजी तहसीलसाठी कार्यालईन परिपत्रक व दि.१३/१०/२०२५ रोजी तालुक्यातील इतर विभागांना परिपत्र काढून स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या ,
मात्र प्रत्यक्षात तहसील कार्यालय व तलाठी कार्यालयातच त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने तहसीलदार यांच्या कार्यालयातच त्या परिपत्रकाला जाहीर ठेंगा दाखवला जात आहे, ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचे बोलले जात आहे.
🔹 तलाठी व मंडळ अधिकारी दुपारी सुमारे तीन वाजता कार्यालयास टाळे ठोकून निघून गेल्याची घटना.
🔹 नियमानुसार १ ते २ या वेळेत मर्यादित म्हणजे जास्तीत जास्त अर्धा तास एवढीच भोजनावकाश असताना सर्व कर्मचारी एकाच वेळी अनुपस्थित.
🔹 निवाशी नायब तहसीलदार बसतात त्या महसूल शाखेस एक बाजूने कार्यालईन वेळेत टाळे — अनेक जबाबदार अधिकारी/कर्मचारी अनुपस्थित. निवाशी नायब तहसीदार ही कार्यालाईन वेळेत अनुपस्थित सर्व खुर्च्या मोकळ्या परंतू पंखे मात्र सुरूच
🔹मंडळ अधिकारी यांच्याकडे कार्यालयीन कामकाजासाठी खासगी इसम कार्यरत असल्याचे निदर्शनास.
याहून गंभीर बाब म्हणजे —
शासकीय नियम पायदळी तुडवूनही शिरूरचे संबंधित मंडळ अधिकारी तक्रारदार सामाजिक कार्यकर्त्यास फोन करून जाब विचारतात.
सायं. ०६:१४ वा. दरम्यान संबंधित मंडळ अधिकारी सतीश पंचरास यांनी वाळुंज यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून संभाषणादरम्यान अयोग्य शब्दांचा वापर केला. “तुम्ही प्लॅन करून आलात, गोड बोलून तक्रार केली” असे पूर्णपणे असत्य व निराधार आरोप करण्यात आले.
शेतकऱ्यांना वारंवार फिरवले फेऱ्या मारायला लावले तर ते वैतागून एजंटांच्या तावडीत सापडतात — हे वास्तव आहे, आणि याकडे लक्ष वेधणे हा गुन्हा आहे का असा प्रश्न वाळुंज यांनी उपस्तीत केला आहे.
महसूल मधील अधिकारी कडून नागरिकांशी अशा प्रकारची भाषा वापरणे अत्यंत अयोग्य आहे. लोकसेवक असल्याचे भान विसरून चुकीचे कृत्य करून पुन्हा जनतेलाच जाब विचारण्याची प्रवृत्ती थांबली पाहिजे.
शासन निर्देशांची पायमल्ली हा केवळ शिस्तभंग नसून नागरिकांच्या हक्कांवर घाला आहे.
——————————————–
“आज तहसीलदार यांच्यासह जिल्हाधिकारी/अपर जिल्हाधिकारी व निवासी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे उपलब्ध पुराव्यांसह तक्रार अग्रेषित करण्यात आली आहे , तहसीलदार यांनी याप्रकारी सर्व संबंधितांना नोटिस काढणार असल्याचे कळवले आहे- प्रशासनाने तात्काळ व निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कार्यवाही करावी; अन्यथा लोकशाही मार्गाने सामाजिक हितासाठी कठोर भूमिका घेण्यास भाग पडेल.
-निलेश वाळुंज
(सामाजिक कार्यकर्ता/व्हिसल ब्लोअर)
