प्रतिनिधी पाचोड- श्री गणेश थोरे
_केकतजळगाव येथील भगवान बाबा माध्यमिक विद्यालय येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे जेष्ठ शिक्षक श्री रघुनाथ जाधव सर होते प्रमुख पाहुणे म्हणून शिवछत्रपती कॉम्प्युटरचे संचालक दादा एखंडे सर होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी भारती बढे व वैष्णवी वाघ यांनी केले . विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपापले मनोगत आणि शाळेतील विविध अनुभव व्यक्त केले कुमारी तनुजा बढे, गणेश नागरगोजे, संकेत थोरे, उत्कर्ष केकाण, सोनाली वाघमारे, वैष्णवी केकान या विद्यार्थ्यांनी शाळेतील विविध अनुभव आणि शाळेबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. संतोष सव्वाशे सर, रघुनाथ जाधव सर , कल्याण सोनवणे सर , बाळासाहेब बोबडे सर , विष्णु टोपे सर सदाशिव थोरे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे श्री एखंडे सर यांनी करिअर मार्गदर्शन आणि भविष्यातील येणाऱ्या पिढीत आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन केले. कु कावेरी मगर हीने आभार मानले._
_कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यासह सर्वजन उपस्थित होते._
