दैनिक चालू वार्ता पिंपरी चिंचवड प्रतिनिधी: केशव पाळवदे.
चाकण MIDC परिसरातील कामगारांसाठी मोठी
आनंदा्ची बा्तमी
Employees’ stale insurance Corporalion
(ESIC) तर्फें चाकणमध्ये ३५० खाटांचें अत्याधुनिक
रुगणालय उभारणयात येणार आहे. यासाठी
Maharashtra Industrial Development
Corporation (MIDC) ने (८.५ एकर जागेचे वाटप
केले आहे.
या प्रकल्पामुळे चाकण, तळेगाव आणि
खेड-राजगुरूनगर परिसरातील लाखो विमाधारककामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सध्या पश्चिम महाराष्ट्रात (ESIC )ची थेट दोन रुग्णालय बिबवेवाडी (पुणे) आणि कोल्हापूर येथें कार्यरत आहेत,चाकण MIDC परिसरातील सुमारे ७ लाखांहून
अधिक कामगारांना या नव्या रुग्णालयाचा लाभ होणारआहे
(ESIC)चे संयुक्त संचालक
सुकांता दास यांनी सांगितले की, जागेचा ताबा मिळाल्यानंतर लवकरच बांधकाम प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी या
निर्णयाचे स्वागत केले असून, अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली मागणी आता पूर्णत्वास येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या आरोग्यासाठी एक मोठे पाऊल ठरले आहे.
