सटाणा (बागलाण) : अमोल बच्छाव
मुंजवाड ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांची दि. 30 मार्च रोजी मासिक सभा तसेच कामाचा पाठपुरावा करणाऱ्या सर्व गांवकऱ्यांची एकत्रित सभा ग्रामपंचायत सभागृहात पार पडली या सभेत धक्कादायक सत्य बाहेर आले.
तालुक्यातील मुंजवाड गावात सन 2023 पासून सामाजिक न्याय विभागामार्फत बुद्ध विहाराच्या उभारणीसाठी निधी मंजूर असताना संबंधित यंत्रणा गेल्या तीन वर्षांपासून ते काम करण्यासाठी टाळाटाळ करत आहे.
गावकऱ्यांनी पाठपुरावा करुन देखील हे काम का होत नाही असा प्रश्न उपस्थित केला असता, पंचायत समिती उपअभियंता उडवाउडविची उत्तरे देत आहेत, हे असे का केले जात आहे या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला असता तेथिलच एक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हरी पांडूरंग जाधव नामक व्यक्तीचा एकतर्फी विरोध असल्याचे पुराव्यानिशी समोर आले आहे.
संपूर्ण गावाची या कामाला संमती असताना, ग्रामपंचायतीने तचेस सर्व संबंधित यंत्रणेची ना-हरकत असताना देखील, संबंधित व्यक्तीचा विरोध हा केवळ जातीयद्वेषापोटी असून समाजात तेढ निर्माण करणारा असल्याने, त्या व्यक्तीबद्दीबद्दल समाजात चांगलाच रोष निर्माण झाला आहे. संबंधीत व्यक्ती माळी समाजाची असताना देखील त्याकडून असा प्रताप केला जात असल्याने, आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून, त्याने क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या विचारांची प्रतारणा केली असल्याचे बोलले जात आहे.
उपरोक्त सर्व बाबींचा विचार करता, या व्यक्तीने असा विरोध का चालविला आहे? या व्यक्तीला जातीय तेढ निर्माण करण्याची तसेच कायदा सुव्यवस्था बिघडविण्याची कोणी सुपारी दिली आहे का? या व्यक्तीची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? या सर्व बाबींचा शोध घेण्यात यावा, या व्यक्तीचा क्रिमिनल ट्रॅक रेकॉर्ड तपासण्यात यावा या मागणीसह, अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांच्या शासकीय कामाला अडथळा निर्माण करुन, त्यांच्या विकासाला विरोध करणारी समाजविघातक कृती करणाऱ्या या व्यक्तीबद्दल ‘अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989, (सुधारित अधिनियम 2015-16) Atrocities Act), महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८, नागरी हक्क संरक्षण अधिनियम- १९५५ तसेच भारतीय न्याय संहिता-2023 मधिल विविध तरतुदींअन्वये गुन्हा दाखल करावा, गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून योग्य प्रतिबंधात्म कारवाई करण्यात यावी, संबंधित व्यक्तीच्या आर्थिक स्रोतांची पडताळणी करुन मालमत्ता तपासण्यात यावी, गावातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अशी नागरीकांची ठाम मागणी आहे.
दरम्यान सदर बुद्ध विहाराच्या कामाला तात्काळ सुरुवात करण्यात येऊन, पूर्णत्वास नेण्यात यावे या विषयावर सर्वांनी एकमुखाने संमती दर्शविली.
