झेलेन्स्कींनी मांडला सीक्रेट प्लॅन; जगात खळबळ…
कीव्ह : मध्यपूर्वेतील अमेरिका इराण तणाव काही निवळण्याचे नाव घेईना.
यामुळे जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. इराणने जगातील सर्वात महत्त्वाचा तेल पुरवठा मार्ग स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद केला आहे. यामुळे जागतिक पातळीवर मोठे उर्जा आणि इंधन संकट निर्माण झाले आहे. आता या वादात कोणालाही अपेक्षा नसताना युक्रेनने उडी घेतली आहे.
काय म्हणाले झेलेन्स्की ?
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी हा पेच सोडवण्यासाठी त्यांचा अनुभव वापरण्याची तयारी दर्शवली आहे. झेलेन्स्की यांनी सांगितले की, ज्यावेळी रशियाने काळ्या समुद्रात युक्रेनची नाकेंदी केली होती, तेव्हा त्यांच्या सैन्याने ती यशस्वीरित्या तोडून अन्नधान्न निर्यातीचा मार्ग मोकळा केला होता. आजच्या घडीला सागरी नाकेबंदी हटवण्याचा अनुभव युक्रेनशिवाय कोणत्याही देशाकडे नाही, असा दावा झेलेन्स्की यांनी केला आहे. त्यांनी जागतिक समुदायाकडे विनतं केली आहे की, युक्रेन आपली ग्रेन कॉरिडॉर टेक्निक आणि युद्धनीतीवर होर्मुझची नाकेबंदी तोडू शकतो.
काय आहे प्रस्ताव ?
झेलेन्स्की यांनी होर्मुझचे संकट सोडवण्यासाठी दोन मार्द सुचवले आहेत. यामध्ये पहिला मार्ग कुटनीतीक चर्चा, इराणशी राजकीय पातळीवर चर्चा करुन होर्मुझचा मार्ग मोकळा करवा असे त्यांनी म्हटले आहे. आणि कुटनीती अपयशी ठरली, तर एकतर्फे नियंत्रण मिळवण्यासाठी डिफेंस फायटर जेट्स, मोठी युद्धनौका, लष्करी ताफा आणि इलेक्ट्रॉनिक संरक्षण नेटवर्क तैनात करणे आवश्यक असल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले. सध्या या वादात युक्रेनच्या एन्ट्रीन जगभरात खळबळ उडाली आहे. झेलेन्स्की यांनी हेही स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत त्यांना मदत मागितली जात नाही, तोपर्यंत यामध्ये सहभागी होणार नाही.
होर्मुझचा मार्ग इतरा महत्त्वाचा का ?
होर्मुझ मार्गावरुन जगाच्या एकूण तेल पुरवठ्यापैकी सुमारे २०% केला जातो. हा मार्ग इराणने बंद केल्यामुळे आशिया आणि युरोपमध्ये इंधन आणि उर्जा संकट निर्माण होण्याची भीती आहे. सध्या अनेक जहाजे केप ऑफ गुड होप मार्गाने जात आहे. यामुळे वाहतुकीचा खर्ज ७० टक्क्यांनी वाढला आहे. तसेच होर्मुझ बंद असल्याने जागतिक तेल बाजारावरील परिणामांमुळे अर्थव्यवस्थेलाही फटका बसत आहे.
