थेट 40 टक्के…
इराण आणि अमेरिका युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांना एका मागून एक मोठे धक्के बसताना दिसले. यादरम्यान दोन आठवड्यांकरिता युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका युद्धबंदीची बैठक होणार आहे.
त्या बैठकीपूर्वी इराणकडून अट ठेवण्यात आली. इराणकडून पुन्हा होर्मुज खाडी बंद करण्यात आली. युद्ध सुरू झाल्यापासून जग संकटात आहे. गॅस प्रकल्प आणि तेल रिफायनरीला टार्गेट करून हल्ले करण्यात आली. जगात तेलाचे मोठे संकट आहे. ज्यावेळी जगातील अनेक देशांमध्ये तेलाचे मोठे संकट होते, लॉकडाऊन लावण्याची वेळ आली, अशावेळी भारताच्या मदतीला रशिया धावून आला.
भारतात रशियाने तेल पुरवठा केला. रशियाने एलएनजी द्रवीकृत नैसर्गिक वायू बाजारपेठेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. भारतासह आशियाई खरेदीदारांना एलएनजी खरेदीवर 40 टक्क्यापर्यंत मोठी सवलत देत आहे. एकदम कमी किमतीमध्ये एलएनजी उपलब्ध करून दिला जात आहे. आशियातील खरेदीदारांसाठी ही मोठी संधी म्हणावी लागेल. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, इतकी मोठी सवलत मिळत असल्याने आशियाई देश एलएलजीच्या खरेदीसाठी पुढाकार घेऊ शकतात.
इतकी मोठी ऑफर मिळत असल्याने ही संधी म्हणून बघितले जात आहे. आजच्या घडीला इराण आणि अमेरिका युद्धामुळे ऊर्जा पुरवठा जवळपास बंद झाला. पेट्रोनेट एलएनजीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात हा स्टॉक घसरला होता. मात्र, आता नवीन ऑफरमुळे शेअर वधारताना दिसला. इराण आणि अमेरिका युद्धात भारताला पहिला प्रस्ताव रशियाने दिला. रशियाचे उपप्रधानमंत्री डेनिस मंटुरोव यांनी दिल्ली दाैऱ्यादरम्यान भारताला हा प्रस्ताव दिला.
आता भारतीय कंपन्या एलएनजीची मागणी अधिक करू शकतात. होर्मुज खाडी बंद असल्याने भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. त्यामध्येच आता रशियाने तब्बल 40 टक्क्यांपर्यंतची मोठी सूट दिली. इराण आणि अमेरिका युद्धात रशिया भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा करत आहे. ज्यामुळे भारतात कच्च्या तेलाचा तुटवडा नाही. दुसरीकडे भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्ये लॉकडाऊनची स्थिती आहे.
