पुण्यनगरीला खऱ्या अर्थाने आधुनिक शहर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांचे व्हिजन…
पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर सध्या मोठ्या परिवर्तनाच्या टप्प्यातून जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिजनरी मार्गदर्शनाखाली हे शहर गगनभरारी घेण्यास सज्ज होत आहे. राज्य शासनाच्या भक्कम पाठबळामुळे शहरात विविध पायाभूत प्रकल्पांची मालिका सुरू असून पुण्याला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे आधुनिक, वाहतूक कोंडीमुक्त आणि वेगवान सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेले महानगर बनवण्यासाठी वेगाने वाटचाल सुरू आहे.
शहरी विकासाचे आदर्श मॉडेल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिजनरी मार्गदर्शनाखाली पुण्याचा विकास वेगात; तब्बल ८०,००० कोटी रुपयांच्या पायाभूत गुंतवणुकीतून २०३० पर्यंत शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे उद्दिष्ट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली सर्व सोई-सुविधांनी युक्त, सुधारित कनेक्टिव्हिटी, कमी वाहतूक कोंडी आणि सर्व दृष्टींनी उंचावणारे जीवनमान या जोरावर पुणे हे भारतातील शहरी विकासाचे आदर्श मॉडेल बनत आहे. ८०,००० कोटी रुपयांच्या पायाभूत गुंतवणुकीतून २०३० पर्यंत शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे.
सुधारित कनेक्टिव्हिटी, कमी होणारी वाहतूक कोंडी आणि उंचावणारे जीवनमान यामुळे पुणे हे भारतातील शहरी विकासाचे आदर्श मॉडेल बनत आहे. पुण्याला गुंतवणूकदार आणि नागरिकांसाठी आकर्षक आणि आधुनिक शहर बनवणे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ध्येय आहे. महत्वाकांक्षी ‘पाताळ लोक’प्रकल्प येत्या मे महिन्यापासनू गती घेत असून पुण्यातील वाहतूक समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून पाहिला जात आहे. पुणे मेट्रो फेज २ प्रकल्प वेगाने पुढे सरकत असून याद्वारे चाकण, वाघोली, कात्रज यांसारख्या उपनगरांपर्यंत कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर भर आहे.
२०० किलोमीटरचा एकात्मिक मेट्रो विस्तार, प्रकल्प शहराच्या विकासाच्या केंद्रस्थानी
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्हिजनरी नेतृत्वाखाली राज्य शासनाच्या भक्कम पाठबळामुळे शहरात विविध पायाभूत प्रकल्पांची मालिका वेगात सुरू आहे. पुणे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आधुनिक, वाहतूक कोंडीमुक्त आणि वेगवान सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेले महानगर बनवण्यासाठी वाटचाल सुरू आहे. या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी २०० किलोमीटरचा एकात्मिक मेट्रो विस्तार प्रकल्प आहे, जो शहराच्या वाहतूक व्यवस्थेत क्रांती घडवणार आहे. या प्रकल्पातील महत्त्वाचा भाग असलेला हिंजवडी-शिवाजीनगर मार्ग मे २०२६ पासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात २३ किलोमीटरचा मार्ग आणि २३ स्थानके कार्यान्वित होतील. यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. याद्वारे शहराच्या आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे.
पुणे हे ऐतिहासिक वारसा लाभलेले अतिशय महत्वाचे शहर आहे. पुण्याला देशातील एक उत्कृष्ट शहर बनवण्याचे नियोजन आम्ही केले असून त्यावर काम सुरू आहे. आसपासच्या गावांसह या शहराला मेट्रो सिटी बनवण्याची योजना आम्ही तयार केली आहे. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
महत्त्वाकांक्षी ‘पाताळ लोक’ प्रकल्प
याशिवाय ‘पाताळ लोक’ भूमिगत बोगदा प्रकल्पही अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे. येरवडा ते कात्रज या मार्गावरील हा प्रकल्प ५४ किलोमीटर लांबीचा दुहेरी बोगदा असून त्याची अंदाजित किंमत ३२,००० कोटी रुपये आहे. पीएमआरडीएतर्फे राबवण्यात येणारा हा प्रकल्प हिंजवडी ते सिंहगड/कात्रज असा उत्तर-दक्षिण दुवा निर्माण करणार आहे.
मुख्य वैशिष्ट्ये :
१) खर्च आणि व्यवहार्यता : एकूण खर्च ३२,००० कोटी रुपये. येरवडा : कात्रज बोगद्याचा ७,५०० कोटी रुपयांचा भाग सध्या सुधारित आराखड्यात आहे.
२) मुख्य प्रस्ताव : येरवडा (पुणे-नगर मार्ग) ते कात्रज (पुणे-सातारा मार्ग) जोडणारा दुहेरी बोगदा.
३) व्याप्ती : कोथरूड, पाषाण, औंध, खडकी आदी भागांना जोडणारे ५४ किमीचे भूमिगत जाळे.
४) उद्दिष्ट : प्रवासाचा वेळ कमी करणे आणि प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करणे.
५) कालमर्यादा : प्राथमिक अहवाल पूर्ण; सविस्तर प्रकल्प अहवालावर सध्या काम सुरू.
हा प्रकल्प २०२६ पासून गती घेत असून, पुण्यातील वाहतूक समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून पाहिला जात आहे.
असा आहे मेट्रो प्रकल्प : पुणे मेट्रो फेज २ प्रकल्प वेगाने पुढे सरकत असून, चाकण, वाघोली, कात्रज यांसारख्या उपनगरांपर्यंत कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर भर आहे.
* निगडी-चाकण मार्ग : ४०.९ किमी, ३१ स्थानके; पिंपरी-चिंचवड ते औद्योगिक पट्टा जोडणार.
* खराडी-खडकवासला (लाइन ४ व ४अ) : ३१.६४ किमी, २८ स्थानके; आयटी हब ते निवासी भाग जोडणी.
* स्वारगेट-कात्रज विस्तार : ५.४६ किमी भूमिगत मार्ग.
* वनाज-चांदणी चौक आणि रामवाडी-वाघोली विस्तार : उपनगरांना जोडणी वाढवण्यासाठी.
* हिंजवडी-शिवाजीनगर (लाइन ३) : २३.२ किमी मार्ग; जून २०२६ पर्यंत पहिला टप्पा सुरू होणार.
मेट्रो प्रकल्पाची वैशिष्टये
वाढत्या प्रवासी संख्येसाठी तीन डब्यांऐवजी सहा डब्यांची व्यवस्था
स्वारगेट, खराडी, नळस्टॉप यांसारख्या प्रमुख ठिकाणांशी जोडणी
पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक जाळ्याची निर्मिती
लाइन ४ आणि ४अ तपशील :
खर्च : ९,८५७.८५ कोटी रुपये
कालावधी : ५ वर्षे
लांबी : ३१.६३६ किमी
प्रवासी क्षमता :
* लाइन ४ : २०२८ मध्ये ४.०९ लाख, २०४८ मध्ये ७ लाख
* लाइन ४अ : २०२८ मध्ये ३.२३ लाख, २०५८ मध्ये ९.३३ लाख
मुख्यमंत्री फडणवीस यांचे सूक्ष्म नियोजन
* सीसीटीव्ही जाळे मजबूत करून कायदा व सुव्यवस्था सुधारणा
* समाविष्ट गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा
* कचरा व्यवस्थापन आणि भूमिगत सांडपाणी व्यवस्था
* ३२० प्राथमिक व ४३ माध्यमिक शाळांचे आधुनिकीकरण
* पूर नियंत्रणासाठी निधी
* ऐतिहासिक व्यक्तींच्या स्मारकांद्वारे सांस्कृतिक जतन
मुख्यमंत्र्यांची पुण्यासाठी दूरदृष्टी
“पुणे हे तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्राचे केंद्र बनले आहे. देशातील २५ टक्के ग्लोबल क्षमता केंद्रे पुण्यात आहेत. आम्ही पुण्याला देशातील एक सशक्त आणि आधुनिक महानगर बनवण्याचा संकल्प केला आहे. महापालिकेत पारदर्शकता आणण्यासाठी एकात्मिक नियंत्रण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्रिमितीय तंत्रज्ञानाच्या मदतीने अतिक्रमणे आणि बेकायदेशीर बांधकामांना आळा घालता येईल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने बांधकाम नकाशे तयार होतील आणि परवानग्यांबाबतही निर्णय घेता येतील,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कल्पक नेतृत्वाखाली पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि नियोजन यांच्या जोरावर पुणे नव्या युगाकडे वाटचाल करत असून भविष्यातील आधुनिक आणि शाश्वत शहर म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत आहे.
