राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाबाबत अत्यंत गंभीर विधान केलं. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आणि खळबळही उडाली आहे. “वारकरी संप्रदायासारख्या समतेच्या चळवळीतही आता प्रतिगामी विचारांच्या लोकांनी घुसखोरी केली आहे, असं शरद पवार म्हणाले.
इतकंच नाही, तर धर्मांध शक्तींना बळ देणाऱ्या अशा लोकांची आता आम्ही यादी तयार करायला सुरुवात केली आहे, असा इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या या विधानामुळे वारकरी संप्रदायात आणि राजकीय वर्तुळात मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
शरद पवारांनी थेट गणित मांडलं
वारकरी संप्रदायातील कीर्तनकार आणि प्रवचनकारांच्या मांडणीवर बोट ठेवताना पवार म्हणाले की, संप्रदायातील ६० टक्के लोक सध्या धर्मांध शक्तींना बळ मिळेल अशा पद्धतीची मांडणी करत आहेत. याउलट केवळ ४० टक्के लोकच असे दिसतात की जे कीर्तन आणि प्रवचनातून पुरोगामी आणि समतेची भूमिका मांडत आहेत. समाजाला दिशा देणाऱ्या या चळवळीत झालेली ही घुसखोरी चिंतेची बाब आहे.
शरद पवार काय म्हणाले आहेत?
दुसरीकडे वारकरी संप्रदायासारख्या समतेच्या चळवळीतही हे प्रतिगामी लोक घुसखोरी करू लागले आहेत. वारकरी संप्रदायामध्ये 60% लोक हे बोलताना धर्मांध शक्तींना अधिक बळ मिळेल अशा पद्धतीने मांडणी करतात. म्हणून आता आम्ही यादी करायला सुरुवात केली आहे.
आता साधारण चाळीसएक लोक असे दिसतात की ते वारकरी संप्रदायांमध्ये कीर्तन प्रवचन यामधून पुरोगामी भूमिका मांडत असतात. त्यांची अत्यंत गरज आहे. दुर्दैवाने या प्रबोधनाच्या मार्गावर कुठे महिला दिसत नाहीत. महिलांची बदनामी करणारे, त्यांच्यावर टवाळ विनोद करणारे वाढत चालले आहेत. अशा विनोदांना हसणाऱ्या महिला प्रेक्षकांत दिसतात. दुसरीकडे प्रतिगामी विचार मांडणाऱ्या महिला कीर्तनकारांची संख्या मात्र वाढताना दिसते हे दुर्दैव आहे.
महिला कीर्तनकारांबाबत खंत
प्रबोधनाच्या या क्षेत्रात महिलांच्या सहभागावरही पवारांनी भाष्य केलं. दुर्दैवानं प्रबोधनाच्या मार्गावर पुरोगामी विचार मांडणाऱ्या महिला कुठेही दिसत नाहीत. उलट महिलांची बदनामी करणारे आणि त्यांच्यावर टवाळ विनोद करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा विनोदांना महिला प्रेक्षकही हसताना दिसतात. दुसरीकडे, प्रतिगामी विचार मांडणाऱ्या महिला कीर्तनकारांची संख्या मात्र वाढत आहे, हे समाजाचं दुर्दैव आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
आता थेट जाहीर करणार, थेट इशारा
धर्मांध शक्तींना बळ देणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पवारांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. जे लोक वारकरी संप्रदायाचा वापर करून चुकीची मांडणी करत आहेत, त्यांची यादी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तयार केली जात असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. यामुळे येत्या काळात वारकरी संप्रदायातील ‘पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी’ हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
