
दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
पुणे :- हडपसर म्हणजे वाहतूक कोंडी, अशी ओळख निर्माण झालेली असताना एकही वाहनतळ तळ नसलेले उपनगर म्हणूनही उल्लेख केला जाऊ लागला आहे. याच कारणातून चालक मोकळी जागा दिसेल तेथे वाहन उभे करीत असल्याने वाहतूक कोंडीत अधिक भर पडत आहे. तर, वाहतूक पोलीस दिसेल तेथून वाहन उचलून कर्तव्य बजावण्यात दक्ष आहेत. यातून हडपसर परिसरातील नागरिक त्रस्त असून स्वतंत्र वाहनतळ उभारावे, अशी मागणी होत आहे.
हडपसरमध्ये वाहनांची मोठी वर्दळ आणि त्यातून वाहतूक कोंडी होत असते. शिवाय, येथे कोठेही फोर व्हिलर, टू व्हिलर पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था नाही. आधीच वाहतूक कोंडी त्यात पार्किंगची व्यवस्था नसल्याने दिसेल त्या ठिकाणी वाहने अस्ताव्यस्त उभी करावी लागत आहेत. यातून वाहतूक कोंडीत भरच पडत आहे. शहरात ज्याप्रमाणे पार्किंगची व्यवस्था असते त्यानुसार हडपसरमध्ये कोठेही नियोजन नाही. संबंधित अधिकारी लक्ष देतील का ? असे लोकं विचारत आहेत.