
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मंगळवार दि. 26/04/2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वझरगा ता.देगलूर जि.नांदेड येथील शाळेत शाळा पुर्वतयारीचा महामेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. याप्रसंगी इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल बैलगाडीला सजवून त्यांना घरापासून थेट बैलगाडीत बसवून सर्व दाखलपात्र विद्यार्थ्याची भव्य मिरवणूक गावभर काढण्यात आली. मिरवणुकीत शाळेतील विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा साडी, धोतर, सदरा घालून मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. यानिमित्त भजन, नृत्य, लेझिम पथक, वृक्षदिंडी ,भजनी मंडळ पथक इत्यादीसह भव्यदिव्य असा “प्रवेशोत्सव मेळावा” साजरा करण्यात आला. तसेच दिंडीत विविध कलाविष्कार कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले.
मिरवणूकीत गावातील अबाल वृध्द, जेष्ठ प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रसंगी मिरवणुकीनंतर प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे औक्षण व स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मा.श्री.व्यंकटराव पा. जालने व विशेष अतिथी म्हणून वन्नाळी केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री.विठ्ठल वडजे सर व केंद्रीय मुख्याध्यापक मा.श्री.पी.आर.टोके सर तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच संजय औरादे, उपसरपंच बाबाराव सुर्यवंशी, माजी सभापती भगवानराव जालने, शिक्षण समितीचे अध्यक्ष वसंतराव सुर्यवंशी, उच्चविद्याविभूषित तरुण प्रा.डाॅ.गोविंद पाटील, गावातील ज्येष्ठ नागरिक किशनराव सुर्यवंशी, गोविंदराव जालने, बापुराव मा.पाटील, एकनाथ वाघमारे, मारोतराव सुर्यवंशी आदिजन उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. याप्रसंगी सर्व मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर विचारात श्री.पी.आर टोके सर यांनी शिक्षणाचे महत्त्व, विद्यार्थ्यांचा विकास व शिक्षकांची जबाबदारी आदि विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. तर प्रमुख पाहुणे प्रा.डाॅ.गोविंद पाटील यांनी शाळेतील विविध उपक्रम, विद्यार्थीकेंद्री शिक्षण, गावाचे व शाळेचे पुन्हा नव्याने जुळलेले ऋणानुबंध, गावातील सुशिक्षित-सुजान तरूणांची शाळेप्रती असणारी निष्ठा व सहकाऱ्याची भावना, दाखलपात्र विद्यार्थ्यांचे गौरवास्पद कौतुक आदि विषयांवर विस्तृत मांडणी करताना शाळेला प्राप्त होत असलेलं गतवैभव पाहुण एक माजी विद्यार्थी म्हणून फार मोठं आत्मिक समाधान लागत असल्याची भावना व्यक्त केली.
तसेच भविष्यात विद्यार्थ्यावर चांगले संस्कार व ज्ञानदानाचे कार्य करत शाळा अजुनही चांगल्या रीतीने नावारूपाला आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे अशी अपेक्षाही व्यक्त केली. विशेष म्हणजे आजच्या दिवसाचे औचित्य साधत प्रा.डाॅ.गोविंद पाटील यांनी आपला चिरंजीव अभिराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना वही, पेन व उजळणीचे पुस्तक इत्यादी उपयुक्त शैक्षणिक साहित्य देऊन अनोखा वाढदिवस साजरा केला. सदर कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन व नियोजन शाळचे मुख्याध्यापक तथा जिल्हा परिषद शिक्षण व क्रीडा समिती स्वीकृत सदस्य मा. श्री. बस्वराज पाटील तर आभार श्रीमती रेखा देवकते यांनी मानले.
तसेच यावेळी पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध शारीरिक, मानसिक, बौद्धिक चाचण्या घेऊन नावे दाखल करण्यात आली. यावेळी गावातील तरुण विठ्ठल कोकणे, योगेश कोकणे बालाजी सूर्यवंशी, ज्ञानेश्वर कोकणे, माधव सूर्यवंशी, व्यंकटेश पाटील, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, बालाजी टाकळे, पत्रकार माणिक सूर्यवंशी, उत्तम कोकणे, नचिकेत सुर्यवंशी, आदिजन तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य व गावातील सर्व आबालवृद्ध सुजाण नागरिक व शिक्षणप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. एकंदरीत कार्यक्रम अतिशय उत्साहात, उत्कृष्ट नियोजनपूर्वक पार पडला. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षिका कांबळे मॅडम, मिरगाळे मॅडम, देवकत्ते मॅडम, शालेय पोषण आहार कर्मचारी ईराबाई टाकळे,अंगणवाडी सेविका सर्व ताई, शिक्षण समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य व गावातील सुजाण नागरिक मनापासून परिश्रम घेतले आहेत.