
दैनिक चालु वार्ता
परमेश्वर वाव्हळ
पिंपरी प्रतिनिधी
पुणे :- खडकी पोलीस स्टेशन पुणे शहराच्या वतीने जातीय सलोखा व इफ्तार पार्टीचे खास आयोजन ईदगाह मैदान खडकी बाजार पुणे येथे करण्यात आले. जातीय सलोखा वृद्धींगत व्हावा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या हेतूने “रमजान ईद” चे औचित्य साधून या जातीय सलोखा व इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.या कार्येक्रमास आ.शिध्दार्थ शिरोळे, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, संदिप कर्णीक, अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलिस उपायुक्त रोहिदास पवार,सहा.पोलिस आयुक्त आरती बनसोडे, सहा.पोलिस आयुक्त किशोर जाधव, भाजपचे खडकीचे अध्यक्ष धर्मेश शहा, उपाध्यक्ष ललित जैन, भाजपच्या महिला आघाडी सरचिटणीस कु. मनीषा कांबळे, यांच्या सह अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.सदरिल जातीय सलोखा व इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यास खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय चव्हाण,व खडकी पोलीस स्टेशनच्या संगिता जाधव (गुन्हे) शाखा यांनी विशेष परिश्रम घेतले.