
दैनिक चालु वार्ता कंधार तालुका प्रतिनिधी-माधव गोटमवाड।
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
ग्रामीण भागात उन्हाची तीव्रता कमालीचे वाढल्याने तिव्र उकाड्याने जीवाची तगमग होत आहे, वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक ज्यूस सेंटर व कुलर पंख्याच्या दुकानात गर्दी होत आहेत.
सध्या उन्हाचा पारा ४२ वाढत आहे.सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसू लागले आहेत.दरवर्षीपेक्षा यंदा उन्हाळा तिव्र स्वरुपाचा जानवू लागला आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी उस्माननगर परिसरातील नागरिक झाडाचा आसरा घेत आहेत.पण त्या ठिकाणी उष्णतेचा झळा असत आहेत.तर काहीजण विजेवर चालणारे पंखे ,कुलर आदीचा वापर करून उन्हापासून बचाव करताना नागरिक दिसत आहे.उन्हाच्या उकाड्याने ,उन्ह लागणे ,उन्हाळी (जळ) लागने ताप येणे ,अशा अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.
मागील आठवड्यात वीजनिर्मितीला कोळसा आपुर्ण पडत असल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
भारनियमनामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. गुरांना पाणी वेळेवर मिळत नाही.वाढत्या उकाड्याने अंगाची लाही लाही होत असून दिवसा टिनपत्रात राहणे म्हणजे आगीत राहण्यासारखे आहे.तिव्र उन्हा बरोबर पिण्याचे पाण्याचे संकट बनलेले आहे.वाढत्या उन्हामुळे जास्तीचा उकाडा होत असल्याने जीवाची तगमग वाढली आहे.