
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- मोहन आखाडे
शिऊरता वैजापुर
सामाजिक सलोखा आणि एकात्मतेसाठी सर्व समाजातील लोक एकत्र येणे आवश्यक आहे. सर्व धर्मांमध्ये समानतेची जाणीव निर्माण करून आपापसांतील बंधुभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी शिऊर गावातील कार्यक्रमांचा आदर्श घेत दोन समाज एकत्र आल्याने मतभेद दूर होऊन बंधुत्त्व भावना वाढीस लागण्यास मदत होणार आहे. अशा सणांमुळे हिंदू-मुस्लिम बांधव मनापासून एकत्र येतात. सामाजिक सलोखा राखण्यात इफ्तार पार्टीची मोठी मदत होत असून त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होते. आपण सर्व एक आहोत ही भावना वृद्धिंगत होण्यासाठी रोजा इफ्तार पार्टी महत्त्वाची आहे. असे प्रतिपादन शिऊरचे ग्रामपंचायत सदस्य , राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळा पाटील जाधव यांनी केले.
बाळा पाटील जाधव यांच्या पुढाकाराने व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रमजान महिन्या निमित्ताने इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते ,
दिनांक 30 रोजी शिऊर येथील मदिना मशीद येथे सायंकाळी 7 वाजता इफ्तार पार्टी आयोजित केली होती यावेळी ते बोलत होते.
या इफ्तार पार्टीस माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, शिऊर पोलीस ठाण्याचे स पो नि संदीप पाटील, माजी सरपंच नितीन चुडीवाल, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष भास्कर जाधव, पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार, अविनाश भास्कर, अमोल कांबळे, ग्रामपंचायत सदस्य सुनील खांडगौरे, अशोक चव्हाण, मंगेश जाधव, नाजीम पठाण, विजय झिजूर्डे, बाळू पवार,आयुब सैय्यद, मिनीनाथ जाधव, अनिल भोसले, अकबर शेठ, मच्छीन्द्र जाधव, संकेत चुडीवाल, इकबाल सैय्यद,
सलमान शेख, रइस शेख, रामा भागवत, जावेद शेख, अजहर सैय्यद, मुसा पठाण, वजीर शेख, असलम शेख, लद्दु शेठ, सागर मोरे, राजू मंडप, शुभम सुर्यवंशी , आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते