
दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी- समर्थ दादाराव लोखंडे
नांदेड, दिनांक. २ मे, श्री निकेतन हायस्कूल, दिपक नगर, तरोडा (बु) नांदेड येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची ९१७ वी जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी श्री निकेतन हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री यशवंत थोरात सर यांच्या हस्ते जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमांचे अध्यक्ष श्री निकेतन हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री यशवंत थोरात सर यांनी जागतिक लोकशाहीचे जनक, वचन साहित्याचे निर्माते, समतानायक, विश्वगुरु, क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर हे एक विद्रोही विचारवंत होते. त्यांनी १२ व्या शतकामध्ये अनुभव मंडपाची सुरुवात करुन, जातीयता, अंधश्रद्धा, स्त्री पुरुष समानता, शुद्ध आचरणाचा मार्ग दाखविला. जागतिक लोकशाहीची पायाभरणी केली. कायकवै कैलास हा जीवन जगण्याचा मार्ग सांगितला. आशा थोर समाजसुधारका जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचलन श्री प्रकाश कळकेकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री उमाकांत व्हनशेट्टे यांनी मानले. यावेळी शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.