
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी बीड-संभाजी गोसावी
बीडच्या पोलीस अधीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार पुणे सीआयडीचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे देण्यांत आला गृह विभागांने याबाबत शुक्रवारी आदेश काढला. बीडचे पोलीस अधीक्षक आर राजा स्वामी यांची पुणे शहर पोलीस उपआयुक्त पदावर बदली झाल्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक पद हे रिक्त होते सध्या सुनील लांजेवार यांच्याकडे प्रभारी पदभार होता दरम्यान शुक्रवारी गृह विभागांने रिक्त पोलीस अधीक्षक पदाचा पदभार इतर आयपीएस अधिकार्यांकडे देण्यांचा निर्णय घेण्यांत आला असुन. यांत पुणे सीआयडीचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे बीड जिल्ह्यांचा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार सोपविला गेला व त्यांना तत्काळ नियुक्ती ठिकाणी हजर राहण्यांचे आदेश प्राप्त झाल्यांने पंकज देशमुख यांनी सोमवारी बीड पोलिस मुख्यालयांत हजर होऊन आपला पदभार स्वीकारला यावेळी त्यांचे अपर पोलिस अधीक्षकासह सर्व पोलिस अधिकाऱ्यांकडूंन स्वागत करण्यांत आले.पंकज देशमुख यांनी यापूर्वी उस्मानाबाद, सातारा, पुणे सीआयडी म्हणून त्यानी या जिल्ह्यांमध्ये त्यांची कामगिरी उत्कृष्ट ठरली