
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- जिल्हाभरात रमजान ईद,महात्मा बसवेश्वर जयंती तसेच विष्णूचा सहावा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुराम जयंती यावेळी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली तसेच जिल्हाभरात कुठलाही शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही करीता मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सर्व सण-उत्सव शांततेने,जातीय-धार्मिक सलोखा राखून साजरे केले पाहिजे तसेच आप-आपसातले प्रश्न समोपचाराने व सहकार्याच्या भूमिकेतून सोडले पाहिजेत.शांतता कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा पोलीस प्रशासनावर मोठा ताण येतो तेव्हा सर्वसामान्य नागरिकांना किंमत मोजावी लागते.हे लक्षात घेऊन अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापुसतळणी येथील उन्हाळा प्रारंभी गाडगेबाबा पाणपोईचे संस्थापक तथा प्रसिद्ध पक्षीमित्र अरुण शेवाणे यांनी कापूसतळणी बस स्थानक जवळील ईदगा परिसरात पवित्र रमजान ईद निमित्त शरबत वाटपाचे आयोजन केले.हिंदू व बौद्ध नागरिकांच्या हस्ते शरबत देऊन ईद सणाच्या मुस्लिम बांधवांना यावेळी शुभेच्छा दिल्या.ज्यामुळे गावात शांतता,कायदा-सुव्यवस्था प्रश्न हा कायम राखण्यासाठी भविष्यात मदत होईल असे कार्यक्रमाचे आयोजक अरुण शेवाणे यांनी सांगितले.
ठाणेदार श्री.सचिन इंगळे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून प्रेम,आदरभाव,संयम,नियम सौहार्द,जिव्हाळा,सद्भावना आणि एकोप्याचा संदेश देणाऱ्या या पवित्र रमजान ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या तसेच उद्घाटन प्रसंगी ठाणेदार सचिन इंगळे यांनी यावेळी म्हटले की,येथील हिंदू मुस्लिम समाज बांधवांचे सलोख्याचे नाते,ऐक्य व मैत्रीपूर्ण संबंध समाजसेवक अरुणभाऊ शेवाणे यांच्या अथक प्रयत्नाने केलेल्या या शरबत वाटप कार्यक्रमच्या माध्यमातून जिल्ह्यासमोर एक मोठा आदर्श निर्माण केला असे ठाणेदार सचिन इंगळे यांनी यावेळी म्हटले.
यावेळी कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष ग्रा.पं.सदस्य श्री.किशोर खडसे तर प्रमुख पाहुणे म्हणून तर ग्रा.वि.अ.विजय कथलकर,ग्रा.पं.सदस्य मंगेश रोकडे हे होते तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरुण शेवाणे,प्रदीप सातवटे,प्रशांत सरदार,चेतन बाबणेकर,संजय हिंगे,वसंत बानाईत,सुरेश महानकर आदींनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला हजारो हिंदू-मुस्लिम-बौद्ध बांधवांनी सहभाग नोंदवून हिंदू-मुस्लिम-बौद्ध ऐक्याचे अनोखे दर्शन घडवुन राष्ट्रीय एकात्मतेचा उत्सव साजरा झाल्याचे पंचक्रोशीत चर्चा होत आहे.