
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजुर्डे पाटिल
लवकरच मान्यवरांच्या शुभहस्ते होणार पुरस्कार वितरण – संस्थेचे सचिव प्रा. सहदेव मोरे पाटील यांची माहिती
गंगापूर – कोरोना सारख्या जागतिक महामारी त सरपंच म्हणून मागील दीड वर्षातील अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आपल्या कामाचा आदर्श इतरांनी घ्यावा अशा स्वरूपाचे काम रणाऱ्या व कोरानाकाळात जीवाचे रान करून गावाच्या भवितव्याचा विचार करत प्रसंगी गावकऱ्यांच्या रोषाचा सामना करणार्या परंतु न डगमगता आलेल्या संकटाला निधड्या छातीने सामोरे जाऊन सरपंच पदावर असताना कोरोना काळात व गाव परिसरातील प्रत्येक प्रश्नांवर अत्यंत प्रशंसनीय व प्रेरणादायी असे काम केल्याबद्दल शिवसृष्टी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा मराठवाडा विभागीय आदर्श सरपंच पुरस्कार लासूर स्टेशनच्या सरपंच मीनाताई संजय पांडव व धामोरी खुर्द उपसरपंच रवींद्र चव्हाण यांना जाहीर करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे सचिव प्रा सहदेव मोरे पाटील यांनी दिली.
लवकरच मान्यवरांच्या शुभहस्ते आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त महानुभावांचा विशेष कार्यक्रमांतर्गत सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव प्रा सहदेव मोरे पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.