
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा:-
मुंबई : भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण तापले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे मुंबईतील त्यांच्या निवासस्थानातून बाहेर निघून गेल्या आहेत.
त्या नेमक्या कुठे गेल्या याबद्दल नक्की माहिती मिळालेली नाही. राज ठाकरेंचे निवासस्थान शिवतीर्थाच्या बाहेर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. मनसे कार्यकर्ते राज ठाकरेंच्या बंगल्याच्या बाहेर जमण्यास सुरुवात झाली आहे.
उद्यापासून होत असलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार मनसे विभागप्रमुख महेंद्र भानुशाली यांना घाटकोपर पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले आहे. भानुशाली यांच्या कार्यालयात जाऊन भोंगाही जप्त करण्यात आला. भानुशाली यांनी सर्वप्रथम भोंग्यावर हनुमान चालीसा वाजवली होती. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मुंबई पोलिसांची कारवाईला सुरुवात झाली आहे.
राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, मुंबईत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक सुरु, मनसे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर औरंगाबादेत गुन्हा दाखल झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेबाबत मुंबई पोलीस मुख्यालयात बैठक सुरू झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंगा वरून दिलेल्या इशाऱ्यावर ही बैठक होत आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आणि कायदा व सुव्यवस्था जॉईंट सीपी विश्वास नागरे पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे.