
दैनिक चालू वार्ता कोरेगांव प्रतिनिधी- संभाजी गोसावी
आपण वाढदिवस हा एक उत्सव रोज सौशल मीडिंयावर पाहायला मिळत असतो व ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्याला आपण सोशल मीडिंयाच्या माध्यमांतून शुभेच्छा व्यक्त करतो. पण कोरेगांव तालुक्यांत करंजखोप गावामध्ये ज्याने गावांचे नाव संपूर्ण महाराष्ट्रांच्या कानाकोपऱ्यांत स्वतांच्या वेगांच्या जोरावर गाजविले आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रांत आम्हांला एक वैयक्तिक स्थान निर्माण करुन दिले असा आमचा करंजखोप करांचा हुकमी एक्का राणा याचा आज वाढदिवस उत्साहांत संपन्न झाला. यावेळी गावांतील तसेच पंचक्रोशीतील व परिसरांतील ग्रामस्थ व तरुणमंडळी या कार्यक्रम प्रसंगी उपस्थिंतीत होते. यावेळी राणाची करंजखोप गावांतून भव्य मिरवणूक काढण्यांत आली. यावेळी तरुणाईने डॉल्बीच्या ठेक्यांवर , नाद एकच एकच बैलगाडा शर्यत या गाण्यांवर नृत्य करीत आपल्या राणाचा वाढदिवस केक कापून उत्साहांत संपन्न केला. यावेळी करंजखोप गावांतील वाघजाई विकास मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थिंतीना भोजनाची व चहा पाण्यांची व्यवस्था करण्यांत आली होती.