
दैनिक चालु वार्ता वडेपुरी प्रतिनिधि-मारोती कदम
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड व नांदेड जिल्हा मार्शल आर्ट सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन जिजाऊ सृष्टी सिडको नविन नांदेड या ठिकाणी 5 मे ते 15 मे या कालावधीत संपन्न होणार आहे यामध्ये पाच वर्षे ते अठरा वर्ष वयोगटातील मुला-मुलींना कराटे या खेळाचे तंत्रशुद्ध पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे तरी सिडको-हडको होतील मुला-मुलींना या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याचे आव्हान नांदेड जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार क्रीडा अधिकारी गुरुदीप सिंघ संधू ,घटनेचे सचिव सेन्साई एकनाथ पाटील यांनी केले आहे
शिबिर नाव नोंदणीसाठी संपर्क 95 27 96 80 76 क्रीडा विभागातर्फे मोफत कराटे प्रशिक्षणाचे नियोजन आहे याचा सर्वांनी स्वसंरक्षणासाठी फायदा घ्यावा असे क्रीडा विभागातर्फे सचिव एकनाथ पाटील यांनी सांगितले