
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा:-
जालना: भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. रावसाहेब दानवे यांनी याआधी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते.
आता ब्राम्हणाला या राज्याचा मुख्यमंत्री झाल्याचं पाहू इच्छितो असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. जालन्यात 3 मे रोजी आयोजित परशुराम जयंतीच्या कार्यक्रमात बोलताना दानवेंनी हे वक्तव्य केलं आहे. या देशाला दिशा देण्याचं काम आपण सर्व (ब्राम्हण) समाजानं केलं असून मी ब्राह्मणाला केवळ नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पाहू इच्छित नाही तर मी ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री पाहू इच्छितो, असं वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. ”अल्टिमेटमची भाषा कोणी करु नये, कायदा हातात घेण्याचे धाडस केल्यास…” जालना येथे परशुराम जयंती कार्यक्रमाचे ब्राम्हण समाजाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमात बोलताना दानवे यांनी हे वक्तव्य केलं आहे.
शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचं प्रत्युत्तर दरम्यान या कार्यक्रमात दानवे यांच्या भाषणाला प्रत्युत्तर देताना शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी सध्या राज्याचे मुख्यमंत्री ब्राह्मणच असल्याचे सांगून नवीन करण्याच्या भानगडी सोडून द्या असे म्हणत दानवे यांना टोला लगावला. अजित पवार यांची प्रतिक्रिया राज्यात विशिष्ट जातीचा मुख्यमंत्री व्हावा असं म्हणणे योग्य नाही. तृतीयपंथी पण मुख्यमंत्री होऊ शकतात. यात काहीच हरकत नाही. मात्र जे कोणी 145 चा बहुमताचा आकडा जमवू शकतील त्यांचा मुख्यमंत्री बसेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर केली आहे.