
दैनिक चालु वार्ता शिरपूर प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून चाळीस अंशापेक्षा जास्तीचे तापमान नोंदविण्यात येत आहे. आज धुळ्यामध्ये तापमानाचा पारा आणखीनच वाढला असून जवळपास ४४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या आठवडाभरापासून तापमानामध्ये घट झाल्याचे बघावयास मिळत होते. परंतु आज अचानक तापमानात आणखीनच वाढ झाल्यामुळे धुळेकरांच्या अंगाची लाही लाही होताना दिसून येत आहे. वाढत्या उष्णतेचा परिणाम नागरिकांच्या शरीरावर जाणवू लागला असून उन्हाच्या वाढत्या झळांचा त्रास देखील नागरिकांना जाणवत आहे. त्यामुळे धुळेकर नागरिक वाढत्या उष्णतेमुळे चांगलेच हैराण झाले आहेत.
हवामान विभागातर्फे पुढील चार ते पाच दिवस तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली आहे, यामुळे पुढील चार ते पाच दिवसात धुळ्याच्या तापमानाचा पारा आणखी किती पर्यंत पोहोचतो याकडे धुळेकरांचे लक्ष लागून राहिले आहे