
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : कडाक्याच्या उष्णतेमुळे अनेकांना उन्हाळा नकोसा झालाय. सर्वांचं लक्ष आता पावसाकडे लागलंय. कधी पाऊस येतोय आणि एकदाची या उष्णतेतून सुटका होतेय, असंच प्रत्येकाला वाटतंय.
या दरम्यान भारतीय हवामान खात्याने मान्सूनबाबत अंदाज वर्तवत काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय.
पुढच्या आठवड्यात अंदमानात पाऊस दाखल होणार होणारं आहे. त्यामुळे पाऊस मे महिन्यातच दाखल होणार असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्वीटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.