
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी- आकाश नामदेव माने
जालना (दि.12) वैद्यकीय क्षेत्रात परिचारिकांचे काम अत्यंत महत्वाचे असून त्यांनी कोविडच्या जीवघेण्या काळात केलेले काम समाज कधीही विसरू शकणार नसल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणाले.
शहरातील महात्मा गांधी चौकात असलेल्या जिल्हा स्त्री रुग्णालय येथे जागतिक परिचारिका दिनानिमित्त भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम फाउंडेशनच्या वतीने कॉ.सगीर अहेमद रजवी यांनी प्रतिनिधिक स्वरूपात परिचारिकांच्या गौरव समारंभाचे आयोजन केले होते.
यावेळी व्यासपीठावर माजी उपनगराध्यक्ष श्री.राजेश राऊत काँग्रेस कमिटी जिल्हा कार्याध्यक्ष श्री.राजेंद्र राख, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री.अरविंद देशमुख, शिवसेनेचे शहरप्रमुख श्री.विष्णू पाचफुले, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. श्री.आर. एस. पाटील, माजी शहरप्रमुख श्री.बाला परदेशी, माजी नगरसेवक श्री.संजय देठे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. उपस्थित सर्वांच्या हस्ते परिचारिकांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करून परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
पुढे बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.भास्करराव अंबेकर म्हणाले की कोविडच्या काळात कुटुंबातील नातेवाईकही रुग्णात जवळ जाण्यास धजत नसताना परिचारिका भगिनींनी मात्र आपल्या कुटुंबाची जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करून अनेकांचे प्राण वाचवले. त्यांच्या कार्यामुळे कुटुंबातील असंख्य कर्त्या माणसांचे प्राण वाचल्याने अनेक कुटुंबाचे जीवन पूर्वपदावर आले. कोविडच नाही तर कुठलाही आजार असणाऱ्या रुग्णास त्याच्या वैद्यकीय मदतीच्या काळात वेळेवर औषधोपचार करणे व त्यांना मानसिक आधार देण्याचे काम परिचारिका भगिनी करीत असल्याने त्यांचे ऋण समाज कधीही विसरू शकणार नाही असे शिवसेना जिल्हा प्रमुख श्री.भास्करराव अंबेकर म्हणाले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष श्री.राजेशजी राऊत, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री.राजेंद्रजी राख, श्री.अरविंद देशमुख यांनीही आपल्या भाषणातून परिचारिकांच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. आपल्या प्रास्ताविकातून कॉ.श्री.सगीर अहेमद रजवी यांनी आजच्या दिनाचे महत्व विषद केले. श्री.शैलेश देशमुख, श्री.अरुण सरकटे, श्री.राजेश घोडे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजक कॉ.सगीर अहमद रजवी, सूत्रसंचालन श्री.योगेश चिरखे तर आभार प्रदर्शन श्रीमती घोरपडे यांनी केले.