
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पुणे जिल्हा -गुणाजी मोरे
पुणे: पुण्यातील प्रसिद्ध रूबी हॉल क्लिनिक मध्ये काही दिवसांपूर्वी किडनी तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. एका महिलेला 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून तिच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर या महिलेला ठरलेले पैसे देण्यास नकार देण्यात आला होता. त्यानंतर या महिलेने पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली होती. याप्रकरणी आता पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
रूबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ परवेझ ग्रँट यांच्यासह तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कागदपत्रांची कात्री केली नाही आणि आपली दिशाभूल करत किडनी बदलल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक किडनी रॅकेट प्रकरणी रुबी क्लिनिकमधील 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किडनी रॅकेटचा कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनने पर्दाफाश केला. रुबी क्लिनिकचे डॉक्टर ग्रँड परवेज यांच्यासह पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कागदपत्रांची खात्री न करता दिशाभूल करून किडनी बदलली गेली असल्याचा आरोप आहे.
एका महिलेला 15 लाख रुपयांचे आणिष दाखवत किडनी प्रत्यारोपण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याऐवजी मंजुषा कुलकर्णी यांच्यासह एकूण 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.