
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी – शाम पुणेकर
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास वेल्हे संस्था यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. याप्रसंगी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर व तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास वेल्हे संस्थेचे सचिव मंदार अत्रे यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, इनोव्हेशनच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास वेल्हे संस्थेचे अध्यक्ष उमेश देशपांडे, उपाध्यक्ष प्रकाश मिठभाकरे आदी उपस्थित होते.
वेल्हा-भोरमधील रोजगार क्षमतेतील कौशल्यांमध्ये सुधारणा करणे, कौशल्याधारित प्रशिक्षण अभ्यासक्रम, सामान्य शिक्षण व कौशल्य विकास करणे हा या सामंजस्य करारामागील उद्देश आहे.
या कराराअंतर्गत विद्यापीठाच्या मार्गदर्शनांतर्गत व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रम तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास वेल्हे संस्थेतर्फे राबविण्यात येणार आहे. दरवर्षी २०० ते २५० विद्यार्थ्यांसह प्रौढ व्यक्तीदेखील या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेऊ शकतात.