
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
जोमेगांव :- जोमेगांव ता लोहा येथे हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये दर्शन घेण्यासाठी व सप्ताहानिमीत्त किर्तन श्रवणाचा लाभ घेण्यासाठी गरीबांची माय माऊली शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे समाजसेविका लोहा/कंधार यांनी गावकऱ्यांच्या वतीने किर्तनकार सौ. आशाताई महाराज यांच्या सत्कार केला. यावेळी भास्करराव पाटील जोमेगांवकर सरचिटणीस काँग्रेस नांदेड, योगेश पाटील नंदनवनकर शेकाप जिल्हाध्यक्ष नांदेड, आदिनाथ पाटील जोमेगांवकर सरपंच, असंख्य कार्यकर्ते, गावकरी मंडळी व महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.