
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या की सर्वांनाच वेध लागतात ते मान्सून कधी दाखल होणार. सर्वात पहिल्यांदा बळीराजाला मान्सून वेध लागलेले असतात कारण जून महिना हा पेरणीचा हंगाम असतो यामुळे शेतकरी आपल्या शेताची मशागत करून मान्सूनची वाट पाहत बसलेला असतो दरम्यान आता ही प्रतिक्षा संपणार आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार मान्सून केरळमध्ये 27 मे ला दाखल होणार आहे. मागच्या 3 वर्षाच्या तुलनेत यंदा मान्सून आठवडाभर आधीच दाखल होणार आहे.
मागच्या 3 वर्षांच्या तुलनेत मान्सून यंदा आठवडाभर लवकर येणार असल्याने पाऊस जास्त होण्याची शक्यता आहे. 2019 साली 6 जूनला मान्सून दाखल झाला होता, 2020 साली 5 जूनला तर 2021 साली 31 मे ला मान्सून दाखल झाला होता. यंदा मात्र मान्सून 4 दिवस आधीच दाखल होणार असल्याने पावसाचे सर्व रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे.
केरळमध्ये 27 मेपर्यंत पाऊस दाखल होईल तर तळकोकणात ते 2 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुखे कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदमानानवर आगामी पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होणार आहे. त्यानंतर अरबी समुद्रावर दुसऱ्या आठवड्यात पाऊस सुरू होईल आणि त्यानंतर भारतात पुढील आठवड्यात मान्सून दाखल होईल.