
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा-संभाजी गोसावी
चारित्र्यांच्या संशयावरुन खून झाल्यांच्या घटना वाढत असतानाच आता आणखीन एक प्रकरण समोर आलंय सातारा जिल्ह्यांतील ता. कोरेगांव नागझरी येथे आपल्या पत्नीवर चारित्र्यांच्या संशयावरुन नवऱ्यांने केला बायकोचा खून ही घटना सोमवारी दिनांक 23 मे रोजी सकाळी दहाच्या सुमारांस घडली. या घटनेमुळे नागझरीसह परिसरांत एकच खळबळ उडाली (वैशाली बाबू जाधव वय 37 रा.नागझरी ता. कोरेगांव मूळ राहणार सातारा ) असे या मृत पत्नीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच रहिमतपूर पोलीस ठाण्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड साहेब व त्यांचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याबाबत पोलिस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरुंन जाधव कुटुंबिय हे मुळचे साताऱ्यांचे असुन या दांपत्याला पाच मुले असून मोलमजुरीच्या कामानिमिंत्त काही महिन्यांपासून ता. कोरेगांव नागझरी येथे पती व त्यांच्या कुटुंबांसह वास्तव्यांस असून मिळेल ते काम करुन तो आपला संसाराचा गाडा हाकत होता. वैशाली यांचे (पती बाबू बापू जाधव वय ४२) याला आपल्या पत्नीविषयी चारित्र्यांचा संशय चांगलाच येऊ लागला होता. त्यामुळे दोघांमध्ये सतत होणाऱ्या वादांतून बाबू जाधव याने सोमवारी सकाळी झालेल्या वादातून आपल्या पत्नीच्या डोक्यांत पार घालून तिला गंभीररीत्या जखमी करीत ठार मारले त्यानंतर त्यांने स्वता वरही हल्ला चढविला त्यामुळे तोही गंभीर जखमी झाला होता दरम्यान या घटनेनंतर बाबू जाधव यांस क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयांत उपचारार्थ दाखल करण्यांत आले या घटनेचा तपास रहिमतपुर पोलिस करीत आहेत.