
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे : अकरा शाळांची प्रमाणपत्रे खोटी व बनावट आहेत हे माहिती असताना ती असल्यासचे भासवून शाळांच्या मुख्याध्यापकांद्वारे २५ टक्के मोफत प्रवेशातील विद्यार्थ्यांचे शुल्क प्रतिपुर्ती मिळविण्यासाठी शिक्षणाधिकार्यांना ऑनलाईन सादर केले. ही फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात जोग एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा सुरेखा सुहास जोग यांच्यासह चार जणांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेखा जोग, समग्र शिक्षा अभियानाचे वरीष्ठ सहाय्यक गौतम शेवडे, सेवानिवृत्त उपशिक्षण अधिकारी किशोर पवार, मनरेगा विभागातील वरिष्ठ सहाय्यक हेमंत सावळकर यांच्यावर भादंवि च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत किसन दत्तोबा भुजबळ (रा. अनंत अपार्टमेंन्ट,शिवराज चौक, चंदननगर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेल्या संशयीत आरोपींनी पूर्व नियोजीत कट करून आपआपसात संगनमत करून जोग एज्युकेशन ट्रस्ट मध्ये फार मोठी अफरातफर केली आहे. पुढील तपास चालू आहे.