
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
शिरपूर : दि.२५.घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये आणत का नाही म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी तीन जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेबाबत शिरपूर पोलीसांकडून प्राप्त माहितीनुसार उंद्री (ता.चिखली जि. बुलढाणा ) ह.मु. वसारी ता. मालेगाव येथील सौ. प्रिती विजय अंभोरे वय २२ वर्षे, या विवाहित महिलेने २४ मे रोजी शिरपूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, लग्नानंतर पती, सासरे व सासू कोणत्याना कोणत्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण करीत होते.
वारंवार म्हणत होते की, तुझ्या वडिलांनी लग्नामध्ये हुंडा दिला नाही म्हणून, तू तुझ्या आई वडिलांकडून घरबांधण्याकरीता दोन लाख रुपये आन नाहीतर, तु आमचे येथे राहू नको, असे म्हणून शिवीगाळ करून जिवाने मारण्याची धमकी देत होते. अशा फिर्यादीवरून २४ मे रोजी शिरपूर पोलिसांनी विजय रामचंद्र अंभोरे, रामचंद्र यशवंत अंभोरे व गोदावरी रामचंद्र अंभोरे रा. उंद्री (ता.चिखली जि. बुलढाणा ) या तीन जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनात विनोद चव्हाण करीत आहेत.तुझ्या वडिलांनी लग्नामध्ये हुंडा दिला नाही म्हणून, तू तुझ्या आई वडिलांकडून घरबांधण्याकरीता दोन लाख रुपये आन नाहीतर, तु आमचे येथे राहू नको, असे म्हणून शिवीगाळ करून जिवाने मारण्याची धमकी देत होते.