
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी -गोविंद पवार
वि.दा.सावरकर यांना स्वातंत्रविर सावरकर असे म्हणूनही संबोधले जाते विर सावरकरांनी भारतीय स्वातंत्रयुध्दात महत्वाचे स्थान आहे. आजही भारतातील बहुसंख्य लोक त्यांना क्रांतीकारक म्हणून ओळखतात.
स्वांतत्रविर सावरकरांचा जन्म २८ मे १८८३ साली नाशिक जवळील असलेल्या भागुर गावात झाला त्यांचे वास्तविक नाव विनायक दामोदर सावरकर होते. त्यांच्या वडीलांचे नाव दामोदर सावरकर व आईचे नाव राधाबाई सावरकर होते. त्यांना दोन भाऊ व एक बहिन होती. सावरकर जेव्हा ९ वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. आईच्या निधनानंतर ७ वर्षांनी प्लेगच्या महामारीमध्ये त्यांचे वडीलही वारले पहीलांच्या मृत्यू नंतर त्यांचा मोठा भाऊ गणेश सावरकर यांनी कुटुबांचे पालनपोषन केले.
सावरकर यांनी आपले प्राथमीक शिक्षण शिवाजी विद्यालय नाशिक येथून केले. शाळेत असताना ते शिवजयंती व गणेशउत्सव हे सण मोठ्या आंनदाने साजरे करत असत. या सणांना लोकमान्य टिळकांनी सुरु केले होते. सावरकर सणांच्या वेळी देशभक्ती व राष्ट्रवादी नाटके करत असत. मार्च १९०१ मध्ये त्यांनी रामचंद्र त्र्यंबक चिपलूनकर यांची मुलगी यमुनाबाईशी विवाह केला. त्यांच्या सामन्यांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी पैसे पुरविले व १९०२ मध्ये त्यांनी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये वि.ए. ची डिग्री प्राप्त केली.
स्वातंत्रता आंदोलनात योगदान :
पुण्यात सावरकर यांनी १९०४ मध्ये अभिनव भारत सोसायटीची स्थापना केली. ते स्वदेशी आंदोलनातही सहभागी होते. १९०५ मध्ये बंगालच्या फाळणी नंतर त्यांनी विदेशी कपडयाची होळी केली. त्यांच्या भडकाऊ भाषणाने नाराज इंग्रज सरकारणे त्यांची बि.ए. डिग्री परत घेतली. १९०६ मध्ये सावरकरांना श्यामजी कृष्ण वर्मा शिष्यवृती मिळाली व हि शिष्यवृती सोबत घेवून जून १९०६ मध्ये ते बॅरिस्टर बनण्यासाठी लंडनला गेले. ज्यावेळी ते लंडन येथे राहत होते तेव्हा त्यांनी तिथे भारतीय विदयार्थ्याना इयंज प्रशासना विरुद्ध भडकवण्यास सुरुवात केली. स्वातंत्रविर सावरकर लिखील पुस्तक “द इंडीयन चरि ऑफ इंडीपेंडेंन्स” लिहून पुर्ण केले. परंतु ब्रिटीश शासनाने भारत व इंग्लड या दोन्ही ठिकाणी पुस्तकाच्या प्रकाशनावर बंदी घातली. नंतर या पुस्तकाला हॉलंडमध्ये मॅडम भिकाजीकामा व्दारे प्रकाशित करण्यात आले होते. आणि ब्रिटीश शासनाविरुद्ध देशभरात कार्यरत असलेल्या क्रांतीका-या पर्यंत हे पुस्तक पोहचविण्यासाठी त्याची तस्करी करण्यात आली.
सावरकरांना ब्रिटीशाब्दारे अटक
ज्यावेळी तात्कालीन नाशिकचे कलेक्टर ए. एम. टि. जॅक्शनला गोळी घालून हत्या करण्यात आली त्या वेळी सावरकरांना ब्रिटीशनी पकडले इंडीया हाऊस सोचत त्यांच्या संबंधाचा संदर्भ देवून त्यांना या हत्येमध्ये फसविण्यात आले. सावरकरांना १३ मार्च १९१० ला लंडनमध्ये अटक करून भारतात पाठवण्यात आले. त्यांच्यावर हत्यारांची अवैध वाहतूक, भडकाऊ भाषण आणि राजद्रोहाचे आरोप लावण्यात आले. व ५० वर्ष काळया पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली.
काळ्या पाण्याची शिक्षा
काळया पाण्याची शिक्षा अंदमान निकोबार बेटावरील शेल्युलर जेलमध्ये दिली जायची. काळया पाण्याची शिक्षा भोगणान्या स्वातंत्र्यसैनिकांना कठिण परीश्रम करावे लागायचे. येथील कैदयांना नारळ सोलून त्यामधील तेल काढावे लागायचे त्यांना बैलाप्रमाणे जुंपून मोहरी व नारळाचे तेल काढले जायचे. यासोबत त्यांना जैल बाहेरील जंगलाची साफसफाई करावी लागायची अशा प्रकारची मेहनतीची कामे त्यांना करावी लागत. जवळपास १० वर्षांची काळयापाण्याची शिक्षा भोगल्यानंतर १९२० साली बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी आणि वल्लभभाई पटेल या सारख्या मोठ्या नेत्यांनी सावरकरांच्या सुटकेची मागणी केली. २ मे १९२१ मध्ये सेल्युलर जेलमधून रत्नागीरी येथील तुरुंगात पाठवण्यात आले. रत्नागीरी येथील तुरुंगांत असताना त्यांनी “हिंदुत्व” हे पुस्तक लिहले. ६ जानेवारी १९२४ त्यांना ‘ते ब्रिटीश कायदयांचे पालन करत रत्नागीरी जिल्हयातच राहतील या अटीवर सोडण्यात आले.
आपल्या सुटकेनंतर सावरकरांनी २३ जाने १९२४ ला रत्नागीरी येथे हिंदू सभेची स्थापना केली. या संघांचा उद्देश भारतीय प्राचिन संस्कृतीला संरक्षित करून समाजाचे कल्याण करणे होते. नंतर सावरकर लोकमान्य टिळकांची स्वराज्य पार्टी मध्ये सामील झाले त्यांना हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. नंरतच्या काळात हिंदू महासभेने पाकीस्तान निर्माणाचा विरोध केला. गांधीजीच्या निर्णयाने असहमत असलेल्या हिंदू महासभेचा एक तरुण नथुराम गोडसे यांनी १९४८ मध्ये गोळी मारुण गांधीजींची हत्या केली. गांधी हत्या प्रकरणात भारत सरकारणे सावरकरांना ही अटक केली होती. परंतु त्यांच्या विरुद्ध पुरावे न मिळाल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष घोषित केले.
२६ फेब्रुवारी १९६६ ला विनायक दामोदर सावरकर (स्वातंत्र्यविर सावरकर) यांनी जगाचा निरोप घेतला. अशा या थोर स्वातंत्र्यविरास विनम्र अभिवादन .
मारोती धर्माजी बट्टलवाड
मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
पांगरी ता.लोहा, जि.नांदेड
मो.नं – 8208493077