
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी- प्रा अंगद कांबळे
संघर्ष बौद्धजन युवा मंडळ भापट मुंबई व बौद्धजन ग्रामस्थ मंडळ आणि माता रमाई महिला मंडळ स्थानिक आयोजित बुद्ध जयंती, श्री छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज , ह्यांची संयुक्त जयंती आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांची १३१ वी जयंती भापट पवित्र वास्तू बुद्धीविहार ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंबई मंडळाचे कार्याध्यक्ष आयु मिलिंद मोहिते हे होते कार्यक्रम सूत्रसंचालन सचिव आयु संदेश मोहिते ह्यांनी केले कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मुंबई मंडळाचे खजिनदार आयु प्रफुल्ल मोहिते ह्यांनी करून शेवट आभार प्रदर्शन मंडळाचे सहसचिव ऍड आयु प्रतीक मोहिते ह्यांनी केले
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून
ग्रामसेवक संघटना अध्यक्ष मा. योगेश पाटील साहेब उपस्थित होते , भापट तलाठी मा. पांडुरंग कळंबे साहेब उपस्थित होते ग्रामपंचत कोळवट सरपंच मा. राजाराम तीलटकर साहेब उपस्थित होते प्राथमिक शिक्षक जयशिंग बेटकर साहेब उपस्थित होते इत्यादी सरकारी अधिकारी यांना निमंत्रित करून पुढील काळात येणाऱ्या सरकारी योजना राबविण्यात संघर्ष बौद्धजन युवा मंडळाला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही असे दिसून येते व इत्यादी सरकारी अधिकारी ह्यांचा मान सन्मान करून आपण बुद्ध धम्माचे अनुयायी आहोत हे संघर्ष बौद्धजन युवा मंडळ भापट ह्यांनी पटवून दिले
आणि उत्तीर्ण विध्यार्थी ह्यांना शाल पुष्प सन्मानचिन्ह देऊन गौवरवण्यात आले अशा प्रकारे सुंदर आणि छान कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पूर्ण नियोजन मुंबई मंडळाने करून स्थानिक मंडळाने मोलाचे सहकार्य केले आणि सर्वच सभासद कोर कमिटी ह्यांनी सहकार्य केले असेच अनेक कार्यक्रम आयोजित करून पुढील युवा मूल ,मुली ह्यांना शिक्षणा बाबतीत जे शक्य होईल ते सहकार्य केले जाईल असे आश्वासन देण्यात आले
मुंबई कोर कमिटी
अध्यक्ष सागर मोहिते , उपाध्यक्ष मयूर मोहिते
कार्याध्यक्ष मिलिंद मोहिते सचिव संदेश मोहिते
सहसचिव ऍड प्रतीक मोहिते, खजिनदार प्रफुल्ल मोहिते ,संघटक संदीप मोहिते , सहसंघटक सचिन मोहिते मुंबई मंडळाचे सलागर सुरेश पवार, सुधाकर मोहिते , बाकी सर्व सभासद उपस्थित होते