
दैनिक चालू वार्ता वाडा तालुका प्रतिनिधी-मनिषा भालेराव
वाड्यातील गणेश मैदान येथे नगरपंचायतीच्या रुग्णवाहिकेचे उदघाटन व लोकार्पण सोहळा संपन्न वाडा नगर पंचायतीच्या ठरवा प्रमाणे आज (दि ३१मे मंगळवार )रोजी आयोजित करण्यात आले होते
वाडा नगरपंचायतीच्या आरोग्य विभागा मार्फत वाड्यातील नागरिकांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली असून या रुग्णवाहिकेचे लोकार्पण व उद्घाटन आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
वाडा शहरातील नागरिकांसाठी रुग्णवाहिकेची अत्यंत गरज होती ती आज पूर्ण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
याप्रसंगी वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा गीतांजली कोळेकर, उपनगराध्यक्ष संदीप गणोरे,तसेच वाडा नगर पंचायतीचे कर्मचारी, सर्व अधिकारी, सर्व नगर सेवक नगर सेविका , प्रभारी तथा मुख्य अधिकारी तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.