
दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी-नवनाथ डीगोळे
चाकुर तालुक्यातील मौजे हणमंतवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे युवा नेते सुमितभैया वाघ यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले
यावेळी राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत जयंतीनिमित्त मोठी रँली काढण्यात आली
यावेळी जयंती समितीच्या वतीने राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव वाघ यांचा सत्कार करण्यात आला तसेच विविध मान्यवरांचा संंयोजन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणपतराव नितळे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष गंगाधर अप्पा आक्कानवरु,युवक जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम जाधव,सहाय्यक फौजदार विश्वनाथ येडके,सामाजिक न्याय राष्ट्रवादी सेलचे विष्णू तिकटे,अंकुश बोमदरे,बाजीराव किसवे सह गावातील युवक पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते….