
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -कवि सरकार इंगळी
मा. कवी चंद्रकांत जोगदंड आणि मा. कवी आत्माराम हारे आयोजित भव्य राज्यस्तरीय कवि संमेलन आणि साहित्य पुरस्कारासाठी निवड झालेल्या वेग वेगळ्या साहित्य प्रकारातील एकूण आठरा पुस्तकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले . ज्येष्ठ साहित्यिक कवी मा. श्री विलास कुंभार यांच्या *” काव्य परिमल “* ह्या त्यांच्या विविध विषयांच्या भावस्पर्शी कविता असलेल्या काव्यसंग्रहाला मा. कवी चंद्रकांत जोगदंड व ग्रामीण कथाकार मा. श्री बबनराव पोतदार यांचेकडून सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . तसेच मान्यवर सेवा नि.पोलीस आधिकारी श्री प्रकाश देशमुख साहेब व त्यांच्या सुविद्या पत्नी सौ. जयश्री देशमुख यांनीही त्यांचा शाल आणि गुलाब पुष्प देऊन गौरव केला .
पणे येथील मराठा चेंबर्स सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला.सदर कविसंमेलनात अनेक नामवंत नवोदित कविंनी सहभाग नोंदवून संमेलन यशस्वी केले.