
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी-गोविंद पवार
अहिल्यादेवी होळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचा संपूर्ण भारतभर विस्तार केला — डॉ. यशपाल भिंगे
लोहा शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश दादा हाके ( भाजपा प्रवक्ते) होते तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डाॅ. यशपाल भिंगे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. अध्यक्ष संभाजीराव धुळगुंडे, महाराज, लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, माजी जि.प. सदस्य भगवानराव हाके, माजी जि.प. सदस्य चंद्रसेन पाटील, माजी जि.प. सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, युवानेते कृष्णा भैय्या दळनर, , माळेगावच्या पालखीचे मानकरी तथा स्वागताध्यक्ष पप्पू उर्फ व्यंकटेश नाईक,
वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले, उपनगराध्यक्ष दत्ता वाले, नगरसेवक करीम शेख, नगरसेवक नबीसाब शेख, प्रा डॉ संजय बालाघाट, व्यंकटेश नाईक मुरहारी कुंभारगावे युवराज वाघमारे,
आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
नंतर भाषणाचा कार्यक्रम झाला.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. यशपाल भिंगे पुढे आपल्या भाषणात म्हणाले की, या देशाच्या आधुनिक काळातील जाणता राजा आधुनिक राजे राजर्षी शाहू महाराज होते. या कार्यक्रमाची तयारी बऱ्याच दिवसांपासून धीरज भैया हाके व त्यांची टीम करीत आहे. कार्यक्रमाचे बळ कुणीतरी वाढवले तर त्याची शान रहाते आत्मनिरिक्षण करा जबाबदारी आपल्याच खांद्यावर घ्या. या भागात नाईकांनी पराक्रम गाजविला मराठवाड्याचा इतिहास नाईकाशिवाय पुर्ण होत नाही ,
कंधारला इथल्या लोकप्रतिनिधीनी चुना फासला येथे एखादी वीट रचली नाही कंधार हे नंदनवन होते. कंधारला ८ व्या शतकात राष्ट्रकुटाची राजधानी आहे. येथे अनेकजण येतात चांगले हाॅटेलस नाहीत चांगले रस्ते नाहीत.लोक जाळ्या धरुन बसतात .
तसेच खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे नाव न घेता ते म्हणाले की लोकांमध्ये ११ माशी ,१२ माशी पर्यंत राजकारण आले . तसेच ना. अशोकराव चव्हाण यांचे नाव न घेता म्हणाले की ना. अशोकराव चव्हाण यांना भिंगे सर यांनी पाडले तर मी त्यांना पाडले नाही ११ माशी व १२ माशी चे जातीचे राजकारण करणाऱ्यांनी पाडले जयंती निमित्त खर बोलतो असे प्रा. डॉ. यशपाल भिंगे म्हणाले .
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, जात म्हणून मतदान देऊ नका आमचे कार्य पहा ,आमचे चारित्र्य पहा ,आमचे इमान पाहून मतदान करा .आज आमदार व्हायचे म्हटले तर ५० कोटी रुपये लागालेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त संकल्प करा माझे पुर्वज राजे होते तर मला ही लोकशाहीत राजा व्हायाचे आहे . येथे शिकलेल्याना काही कळत नाही मतदान कुणाला करायचे ते ठरवायचे.
अहिल्यादेवी होळकर यांनी सर्व जाती धर्मातील लोकांसाठी काम केले. मल्हारराव होळकरांनी दिल्लीच्या पलीकडे अफगाणिस्तानात अटकेपार झेंडा रोवला. येथे सर्व जाती धर्मातील लोकांनी आले पाहिजे होते जात -जात केल्याने भले होत नाही.माणसाने कुण्या जातीत जन्मावे हे त्यांच्या हातात नाही जसे पिंपल्स काॅलेज मध्ये विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करतात तसे देवाकडे मी टाटा बिर्ला यांच्या घरी जन्म घेऊ दे म्हणून अर्ज करीत होते.
घरातील स्त्रियाना समानतेने वागवा त्यांना मान द्या असा संकल्प करा
. आलारे आला वाघ आला असे म्हणू नका माणूस बनायचे शिका जनावर बनवू नका. ९६ कुळातील ६ कुळे धनगरांची आहेत. ४ कुळे माळयाची आहेत. गेल्या दोन वर्षांत ५ कोटी नौकऱ्या गेल्यात , व्यापार उद्योग करा चारित्र्य संपन्न माणसाला पाठिंबा द्या चांगला विचार करा व्यसनापासून दूर रहा असे प्रा. डॉ. यशपाल भिंगे म्हणाले.
तसेच यावेळी नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी आपल्या भाषणात त्यांनी धनगर समाजाचे लोहा येथील जनावरांच्या बाजारातील मैदानात दैवत असलेल्या बिरोबा मंदिरांच्या विकासासाठी येथे संरक्षण भिंत बांधण्याचे जाहीर केले.
तसेच दुपारच्या सत्रात जुना लोहा ते बिरोबा मंदिर बैल बाजार अशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती अभिवादन सभा व भव्य मिरवणूक यशस्वी करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मंडळाचे अध्यक्ष धिरज भैय्या हाके मारोती जंगले गजानन कराडे परशुराम वडजे,किसण गुंठे दशरथ गुंठे वैभव कुमार हाके गजानन कवडे भागवत कोरे सर संदिप बाजगीर गोविंद फुले हानमंत धुळगंडे पिराजी धुळगंडे विठ्ठल हाबगुंडे किरण हाके नवनाथ पोले मोहण पोले परमेश्वर पोले ज्ञानेश्वर होळगीर ,पाराजी धुळगंडे,पिंटू जंगले, देविदास जंगले, बालाजी पोले, विठ्ठल हागरंगे,अशिष धुळगंडे, संतोष धुळगंडे , गोविंद कमळे,मुंजेश आव्हाड, दशरथ मणाडे, मुन्ना नाईक, पिराजी आचने आदीने परिश्रम घेतले
यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होता.