
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी:रामेश्वर केरे
येथील कै.अंबादास भाऊ व्यवहारे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी कै. अंबादास भाऊ व्यवहारे यांच्या स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.यावर्षी शिबिराचे हे १६ वे वर्षे होते.या शिबिराचे उद्धाटन माजी सरपंच प्रदीप भुजबळ,उद्योजक सुरेशशेठ मुनोत यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले.यावेळी प्रतिष्ठित व्यापारी विनोद ठोळे,उपसरपंच बिट्टू भाऊ मोरे,प्रा.अशोक म्हस्के,अविनाश संगेकर, भगवान गाढे,बाबासाहेब सोमासे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरात ४१ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले सामाजीक कर्तव्य पार पाडले.या शिबिरास उपसरपंच संपतशेठ छाजेड,उद्योजक संजय पांडव,ग्राम पंचायत सदस्य अमोल शिरसाट,अशोक सौदागर,नितीन कांजूने,नारायण ठोळे,कल्याण पवार आदींनी भेट दिली.
रक्तसंकलनाचे कार्य शासकीय रक्तपेढी औरंगाबाद यांनी केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश व्यवहारे,उपाध्यक्ष विजय खरोटे, सचिव प्रा.शशिकांत सांगविकर, दिनेश व्यवहारे,योगेश व्यवहारे,संभाजी शेलार,बाबासाहेब कऱ्हाळे, वाल्मीक बळी, कल्पेश गायकवाड मंगेश राऊत ,सचिन गुजकर ,आदींनी परिश्रम घेतले.