
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
जळका भडंग (खामगाव) दि.५. सूसंस्कार शिबिराचे आयोजन जळका भडंग येथे दि. २५ मे पासून दि. २ जून पर्यंत आयोजित केले होते. श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिरात गावातील आबालवृद्ध, विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी यांनी सहभाग घेतला होता. सहभागी विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक, व्यायाम, संगीत असे विविधांगी उपक्रम राबवण्यात आले होते.
सकाळपासून सायंकाळपर्यंत असा आठवड्या भर शिबिराचा उपक्रम राहिला. शिव संस्कार शिबिरांमध्ये योगासन, रोप मल्लखांब, कराटे, लाठी काठी, स्वावलंबन, शिस्त, भगवद गीतेचे अध्याय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची वर्तमान परिस्थिती यावर आधारित भजन, मराठी हिंदी ई. सुसंस्कार श्लोक, ग्रंथ ओव्या, भगतसिंग यांचे चरित्र, शिवचरित्रावर योगेश पाटील यांचे व्याख्यान, वृक्षप्रेमी तरुणाई फाऊंडेशनचे मंजित सिंग यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी गावातील महिला, पुरुष मोठा संख्येने उपस्थित होते.