
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
नांदेड:-शंकरराव पाटील मेमोरियल एज्युकेशन सोसायटी, नांदेड संचलित शंकर कनिष्ठ महाविद्यालय कौठा, ता.जि.नांदेड १२ वी बोर्ड परीक्षा-२०२२ चा निकाल लागला असून विज्ञान शाखेत सर्वप्रथम येण्याचा मान नागलगावकर श्रेयश दिलीप ५७७ गुण ( ९६.१७%), तर द्वितीय शिंदे गौरी प्रमोद ५४८ गुण (९१.३३%), शिंदे ऋतुराज प्रकाश ५४८ गुण ( ९१.३३%) व तृतीय राठोड तेजस्विनी संजय ५३९ गुण ( ८९.८३% ) तसेच कला शाखेमध्ये सर्वप्रथम येण्याचा मान ढाकणीवाले जगतारकौर बसंतसिंघ ५०९ गुण ( ८४.८३%) व द्वितीय बोकारे गायत्री सुधाकर ४८२ गुण ( ८०.३३%) व तृतीय कु. कोपरे काजल नंदिराम ४७५ गुण (८९.१७%) ह्या विद्यार्थ्यांना मिळाले आहेत.शंकर कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे मा.आ. वसंतरावजी चव्हाण, श्री मोहनराव पा. सुगावकर, संस्थेचे अध्यक्ष माजी प्राचार्य श्री. गोविंदराव शं. मेथे सर, सचिव प्रा. तिरुपती मेथे सर, संस्थेचे सदस्य श्री इंजि. विलास पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री के. व्ही. कोपरे, प्रा. सौ. नरवाडे, प्रा. वाघमारे, प्रा. धात्रक, प्रा. बोकारे, प्रा. जाधव, श्री. बस्वदे, श्री. भालेराव आणि श्री. बंडे यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.