
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा–
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राज्यातील माफिया सरकारला गुंडांसारखं राज्य करायचं असून, ठाकरेंनी दाऊदच्या एजेंटला मंत्रिमंडळात ठेवलं होतं.
परंतु, राज्यातील साडेबारा कोटी जनतेच्या रक्षण करण्याची जबाबदारी सध्या माझ्याकडे आहे. त्यामुळे ती पूर्ण होईपर्यंत मला दुसरी कोणतीही जबाबदारी नको असे विधान किरीट सोमय्यांनी केले आहे.
ते म्हणाले की, महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनता माफिया सरकारला धडा शिकवणार असून, आज न्यायालयाने संजय राऊत यांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या समन्समुळे राऊतांनादेखील कोर्टाने जोरदार थप्पड लगावली असल्याचे सोमय्या म्हणाले.