
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
नांदुरा:-दि.१०. जर तुमच्याकडे या ४ गोष्टी असतील. त्यानंतरही तुम्ही मोफत रेशन घेत असाल, तर तपासणीत अपात्र आढळल्यास शिधापत्रिका रद्द होऊ शकते. याशिवाय कायदेशीर कारवाईही होऊ शकते.त्यामुळे अपात्र असल्यास रेशनकार्ड जिल्हा पुरवठा कार्यालयाकडे जमा करावे.
खरं तर, भारत सरकारने कोरोना महामारीच्या काळात गरिबांसाठी मोफत रेशनची व्यवस्था सुरू केली होती. मात्र, गेल्या महिन्यात सरकारच्या निदर्शनास आले की, लाखो अपात्र लोकही दरमहा मोफत शासकीय रेशन घेत आहेत.
मोफत रेशन घेणार्या अपात्रांना शासनाकडून आवाहन करण्यात येत आहे, की अशा लोकांनी त्यांची शिधापत्रिका रद्द करून घ्यावी. शिधापत्रिका रद्द न केल्यास पडताळणीनंतर अन्न विभागाचे पथक ते रद्द करेल आणि अपात्र आढळल्यास त्यांच्यावर कारवाईही होऊ शकते.
नियम काय आहेत
१) जर एखाद्या कार्डधारकाकडे स्वतःच्या उत्पन्नातून 100 चौरस मीटरचा भूखंड
२) स्वताच्या मालकीचे मोठे घर असेल.
३) चारचाकी/ट्रॅक्टर, शस्त्र परवाना.
४) कौटुंबिक उत्पन्न गावात वर्षाला दोन लाख आणि शहरात तीन लाखांपेक्षा जास्त आहे.
अशा लोकांना त्यांचे रेशनकार्ड तहसील आणि डीएसओ कार्यालयात सरेंडर करावे लागेल.
शासनाच्या नियमानुसार अपात्र शिधापत्रिकाधारकाने आपले कार्ड सरेंडर न केल्यास अशा लोकांचे कार्ड तपासणीअंती रद्द करण्यात येणार आहे. याशिवाय त्याच्यावर कायदेशीर कारवाईही होऊ शकते. अशा परिस्थितीत, अपात्र आढळल्यास, सरकार अशा लोकांकडून मोफत रेशन घेऊन जात असल्याने त्यांच्याकडून वसुली करेल.