
दैनिक चालु वार्ता वडेपुरी प्रतिनिधि-मारोती कदम
भाजपा पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दापशेड या गावातील भाजीपाला विकणाऱ्या महिलांना पावसाळ्यासाठी छत्रीचे वाटप करण्यात आले व या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणही करण्यात आले. त्या पूर्वी महादेव मंदिरामध्ये महामृत्युंजय मंत्राचा जप करून चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य मिळावे ,व प्रगती व्हावी यासाठी सर्वांनी संकल्प केला कार्यक्रमाला महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेशउपाध्यक्षा सौ प्रणिता ताई देवरे चिखलीकर, भाजपा नांदेड जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर ,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष ॲड. किशोर भाऊ देशमुख बोडके सर दापशेड येथील सरपंच वीरभद्र राजुरे, व टेळकी चे सरपंच संदीप देशमुख, सभापती आनंदा पाटील ढाकणीकर, भगवान राठोड, चित्रारेखाताई गोरे,मधुकर केंद्रे, विष्णू टोणगे,सुरेश टोणगे,व भाजपा कार्यकर्ते व महिला या कार्यक्रमाला उपस्थित होते