
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पिंपरी : राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये महाविकास आघाडीचे तीन तसेच भाजपचेही तीन उमेदवार विजयी झाले आहेत. सहाव्या जागेसाठी भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला आहे.
देवेंद्र फडणवीस या विजयानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाचे तीनही उमेदवार निवडून आल्याने आनंदाचा क्षण आहे. हा विजय आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक यांना समर्पित करतो. कारण ते आजारी असतानाही पुण्याहून अॅम्ब्यूलन्स मधून येवून मतदान केले.”
राज्यसभेचे विजयी उमेदवार :
प्रफुल्ल पटेल -राष्ट्रवादी काँग्रेस- ४३
इम्रान प्रतापगढी- काँग्रेस- ४४
पियुष गोयल-भाजप- ४८ अनिल बोंडे- भाजप- ४८
संजय राऊत- शिवसेना- ४२
धनंजय महाडिक- भाजप ४८ … सर्व नवनिर्वाचित खासदारांचे हार्दिक अभिनंदन